‘कस्सं?…बबन म्हणेन तसं’ आणि ‘हम खडे तो साला सरकार से भी बडे’ असे एकाहून एक दमदार संवाद असो वा सिनेमातील खलनायक विक्रमदादाचा ‘म्हणजे आम्ही येडे’ हा संवाद असो, आजही ‘बबन’ सिनेमा महाराष्ट्राच्या अनेक सिनेमागृहात आवडीने पाहिला जात आहे. ग्रामीण भागातील युवकाच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाला पश्चिम महाराष्ट्राने तर अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘ख्वाडा’ चित्रपटाचा दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडेनं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाने सुपरहिट ५० दिवस पूर्ण केल्यामुळे, ‘बबन’च्या या घवघवीत यशाचा आनंद साजरा करण्यात आला. या पार्टीत ‘बबन’ सिनेमातील सर्व स्टारकास्ट आणि युनिट मेम्बर्सचा सत्कार करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : ‘ऐ वतन..’ गाण्यासाठी मुंबईच्या या शाळेतील मुलं होती ‘राजी’

‘बबन’ हा सिनेमा २३ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता. त्या दिवसापासून आजतागायत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १३ कोटींची रग्गड कमाई केली आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील काही सिनेमागृहात आजही ‘बबन’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ख्वाडा फेम अभिनेता भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव या सिनेमातल्या प्रमुख कलाकारांच्या कामगिरीचंदेखील सर्वत्र विशेष कौतुक केलं जात आहे. सामान्य कथा आणि सामान्य चेहऱ्यांना घेऊन मोठ्या पडद्यावर सादर झालेल्या या सिनेमाचं यश नक्कीच असामान्य आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baban marathi movie success party for completing non stop 50 days