गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक रमेश चौधरी यांच्या ‘बाबो’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आता या चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चाहत्यांसाठी हा एक सुखद धक्काच आहे. मल्हार फिल्मस क्रिएशन निर्मित या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बाबो’ या चित्रपटात एका गावात असणारे इरसाल नमुने व त्यांच्या भानगडी मिश्कील पद्धतीने मांडल्या आहेत. ट्रेलरची सुरुवातच मुळात डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या एका सुंदर गावाचे चित्र दाखवत मंगलाष्टकाने होते. त्यात एक अभिनेता भारत गणेशपुरे स्पर्धापरीक्षेचे मार्गदर्शन करताना नमुना शब्दाला शोभेल अशा टी.व्ही. अँकरच्या भूमिकेत दिसतो. तर विनोदी भूमिका साकारणारे किशोर कदम यांची सयाजी शिंदे यांच्या बरोबर गावाकडची खुमासदार शैलीतील भांडणांची जुगलबंदी पहायला मिळते.

या गावाच्या अनेक समस्या आहेतच, पण त्याही पेक्षा मोठी समस्या एका नवविवाहित दाम्पत्याला आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करायची आहे, मात्र त्यांचा जागरण गोंधळ झालेला नाही आणि दुसरीकडे गावात अवकाशातील यान कोसळणार असल्याची बातमी टीव्हीवर ऐकायला मिळते. त्यानंतर गावात एकच कल्लोळ निर्माण झाला आहे.

तर चित्रपटाची कथा अरविंद जगताप यांची आहे. या चित्रपटात आजवर अनेक मनोरंजक भूमिका साकारणाऱ्या कलावंतांची मांदियाळी बघायला मिळेल, यामध्ये प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, संवेदनशील कवी, अभिनेते किशोर कदम यांच्यासह भारत गणेशपुरे, किशोर चौगुले, प्रतिक्षा मुणगेकर, निशा परुळेकर, विजय निकम, जयवंत वाडकर, रमेश चौधरी, विनोद शिंदे, मंजिरी यशवंत, स्मिता डोंगरे, प्रिया उबाळे, अरुण शिंदे, पुष्पा चौधरी, प्रकाश भागवत, वैशाली दाभाडे, आकाश घरत, ज्योती पाटील, प्रमोद पंडित, महेश देवकाते, गणेश कोकाटे मयूर कोंडे, श्रेया पासलकर, विनोद शिंदे आदी कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. या चित्रपटाला रोहित नागभिडे आणि हर्ष-करण-आदित्य (ट्रीनिटी ब्रदर्स) यांचे संगीत लाभले असून ‘म्याड रं’ नंतर आता ‘नाचकाम कंपल्सरी’ हे गाणे सर्वत्र गाजत आहे. मंगेश कांगणे गीतकार आहेत. हा चित्रपट ३१ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.