‘रागिणी एमएमएस-२’ चित्रपटातील ‘बेबी डॉल’ या सुपरहीट गाण्याने रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली गयिका कनिका कपूर लवकरच शाहरूख खानचा अभिनय असलेल्या ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटातील गाणे गाताना दिसणार आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच दिसणारे हे गाणे बार डान्सरची भूमिका करणाऱ्या दीपिका पदुकोणवर चित्रीत होणार आहे. या गाण्याने भारावून गेलेला शाहरूख खान या गाण्याचे रिमिक्स करण्यासाठीदेखील उत्सुक आहे. आपल्या या नवीन गाण्याबाबत उत्सुक असलेली कनिका म्हणाली, हे एक अनोखे गाणे असून, अतिशय उत्कृष्ट असे झाले आहे. ‘हॅपी न्यू इयर’ चित्रपटात शाहरूख खान आणि दीपिका पदुकोणशिवाय अभिषेक बच्चन, बोमन इराणी, सोनु सूद, विवान शहा आणि जॅकी श्रॉफ यांच्यासुद्धा भूमिका आहेत. फराह खान या चित्रपटाची निर्माता आणि दिग्दर्शक आहे.

Story img Loader