बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. पण यावेळी अक्षय ‘बच्चन पांडे’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

ट्रेलरची सुरुवात मायरा देवेकरने होते. मायराला बच्चन पांडे नावाच्या गॅंगस्टरवर चित्रपट तयार करायचा असतो आणि यात तिचा मित्र विशू तिची मदत करतो. तर बच्चन पांडे हा एक क्रुक गॅंगस्टर असतो. जेव्हा मायराला कळते की बच्चन पांडेने त्याच्या स्वत: च्या गर्लफ्रेंडचा खून केला आहे. तेव्हा तो तिचा खून करण्याचा निर्णय घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पण आता नक्की हा चित्रपट कसा असणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. ३ मिनिट ४१ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि मसाला पाहायला मिळत आहे.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

‘बच्चन पांडे’ या चित्रपटात अक्षय पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तर मायरा ही भूमिका क्रिती सेनन साकारत आहे. विशू ही भूमिका अर्शद वारसी हा साकारत आहे. तर, सोफिया म्हणजेच बच्चन पांडेच्या गर्लफ्रेंडची भूमिका ही जॅकलिन फर्नांडिस साकरात आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा फर्स्ट लूक शेअर करत “सोफिया का सपना है मॅजिकल लव्ह स्टोरी. क्या #BachchhanPaandey कर पाएगा उसकी हर विश पूरी?” असे कॅप्शन दिले आहे. याशिवाय पंकज त्रिपाठी, प्रतीक बब्बर, संजय मिश्रा, अभिमन्यू सिंग हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

आणखी वाचा : माझ्या हत्येचा कट रचला जातोय; सारेगमप विजेती वैशाली भैसनेची फेसबुक पोस्ट; म्हणाली “आज मला…”

आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये जेसिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहेत. चित्रपटाची कथा निश्चय कुट्टांडा यांनी लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मित साजिद नाडियाडवालाने केली आहे. तर, हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट जिगरथंडाचा रिमेक असल्याचे म्हटले जाते. हा चित्रपट १८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader