बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. पण यावेळी अक्षय ‘बच्चन पांडे’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ट्रेलरची सुरुवात मायरा देवेकरने होते. मायराला बच्चन पांडे नावाच्या गॅंगस्टरवर चित्रपट तयार करायचा असतो आणि यात तिचा मित्र विशू तिची मदत करतो. तर बच्चन पांडे हा एक क्रुक गॅंगस्टर असतो. जेव्हा मायराला कळते की बच्चन पांडेने त्याच्या स्वत: च्या गर्लफ्रेंडचा खून केला आहे. तेव्हा तो तिचा खून करण्याचा निर्णय घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पण आता नक्की हा चित्रपट कसा असणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. ३ मिनिट ४१ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अॅक्शन, कॉमेडी आणि मसाला पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात
‘बच्चन पांडे’ या चित्रपटात अक्षय पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तर मायरा ही भूमिका क्रिती सेनन साकारत आहे. विशू ही भूमिका अर्शद वारसी हा साकारत आहे. तर, सोफिया म्हणजेच बच्चन पांडेच्या गर्लफ्रेंडची भूमिका ही जॅकलिन फर्नांडिस साकरात आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी जॅकलिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा फर्स्ट लूक शेअर करत “सोफिया का सपना है मॅजिकल लव्ह स्टोरी. क्या #BachchhanPaandey कर पाएगा उसकी हर विश पूरी?” असे कॅप्शन दिले आहे. याशिवाय पंकज त्रिपाठी, प्रतीक बब्बर, संजय मिश्रा, अभिमन्यू सिंग हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये जेसिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?
‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहेत. चित्रपटाची कथा निश्चय कुट्टांडा यांनी लिहिली आहे. या चित्रपटाची निर्मित साजिद नाडियाडवालाने केली आहे. तर, हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट जिगरथंडाचा रिमेक असल्याचे म्हटले जाते. हा चित्रपट १८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.