अभिनेता राम कपूर आणि अभिनेत्री साक्षी तन्वर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘बड़े अच्छे लगते हैं’ या मालिकेला एक दशक लोटून गेलं आहे, तरी आजही या मालिकेचे अनेक चाहते दुसऱ्या सिझनच्या प्रतिक्षेत आहेत. लवकरच या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यासाठी अभिनेता नकुल मेहताच नाव आधीच फायनल करण्यात आले होते. मात्र हिरोइनची भूमिका कोण साकारणार? यावर मोठे प्रश्न चिन्ह होते. दिव्यांका त्रिपाठी ही निर्मात्यांची पहिली पसंती होती. मात्र तिने तिचा नकार कळवला असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. त्यानंतर अभिनेत्री दिशा परमारला या भूमिकेसाठी निवड करण्यात आले. दिशा परमार आणि नकुल मेहता तब्बल ८ वर्षांनी एकत्र काम करणार असून त्यांचे फॅन्स प्रचंड खुश झोले आहेत. त्यांनी या जोडीसमवेत एक प्रोमो देखील तयार केला आहे. यात ते ‘बड़े अच्छे लगते हैं’मधे कसे दिसतील याचा अंदाज लावण्यात आला आहे. त्यांनी शेअर केलेला हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘प्यार का दर्द हैं मीठा मीठा प्यारा प्यारा’ या मालिकेतुन नकुल आणि दिशाची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यात त्यांनी आदित्य आणि पंखुरीची भूमिका साकारली होती. त्यांच्या या जोडीला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले असून पुन्हा त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असल्याचे दिसून आले. त्यांच्या एका फॅनने इन्स्टाग्रामवर ‘बडे़ अच्छे लगते हैं’चा नवीन प्रोमो तयार केला आहे. हा प्रोमो तुफान व्हायरल झाला आहे. यात त्यांनी नकुल आणि दिशाच्या पहिल्या मालिकेतील काही क्लिप्स वापरल्याचे दिसून आले आहे.
View this post on Instagram
दिशा आणि नकुलच्या फॅनक्लबने शेअर केलेल्या या प्रोमोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसंच आता अभिनेता राम कपूर आणि अभिनेत्री साक्षी तन्वर यांच्या बदली नकुल मेहता आणि दिशा परमार ‘बड़े अच्छे लगते हैं २’ मध्ये प्रमुख भूमिका साकारणार असल्याने त्यांच्या फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.