Badlapur Case Kiran Mane slams Eknath Shinde : बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच या प्रकरणी कारवाई करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर व आरोपीला पाठिशी घालणाऱ्या शाळेवर कारवाई करण्याची मागणी करत बदलापूरकरांनी मोठं आंदोलन उभं केलं आहे. परिणामी आता राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवला जाणार असल्याची माहिती राज्य सरकारमधील काही नेत्यांनी दिली आहे. पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीला फाशीची शिक्षा होईल, असं वक्तव्य केलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रत्नागिरीच्या चंपक मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कर्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात केलेल्या भाषणात शिंदे म्हणाले, “बदलापूरमध्ये घडलेली घटना खूप दुर्दैवी आहे. या प्रकरणातील आरोपीली फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात मुलींच्या भावनेशी खेळणाऱ्या गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवला जाणार असून गुन्हेगाराला लवकरात लवकर कठोर शासन केलं जाईल. त्याचबरोबर संस्था चालकांवरही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. अशा नराधमांचे हात कलम करण्याचा, छाटून टाकण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघेंचा वारसा सांगणारा महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही”.

court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Arunkumar Singh employee, Ashish Mittal,
अरुणकुमार सिंगच्या कर्मचाऱ्याकडून आशिष मित्तलला पैसे, कल्याणीनगर अपघात प्रकरण
Malegaon blast case Sadhvi Pragya Singh Absence despite bailable warrant
मालेगाव बॉम्बस्फोट खटला : जामीनपात्र वॉरंटनंतरही साध्वी प्रज्ञासिंह यांची अनुपस्थिती
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक

दरम्यान, या भाषणात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून अभिनेते व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पदाधिकारी किरण माने यांनी टोला लगावला आहे. माने म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी दावा केला आहे की चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात एका नराधमाने बलात्कार केला व दोन महिन्यांपूर्वी त्याला फाशीची शिक्षा झाली. महाराष्ट्रात दोन महिन्यांपूर्वी कोणाला फाशी झाली आहे हे कोणी सांगू शकेल का?”

Kiran Mane FB post
किरण माने यांची फेसबूक पोस्ट (PC : Facebook Screenshot)

हे ही वाचा >> CM Eknath Shinde : “आता लाडका शेतकरी योजना राबवणार”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

किरण मानेंचा एकनाथ शिंदेंना टोला

किरण माने यांनी फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “मुख्यमंत्री आज भाषणात म्हणाले, ‘चार महिन्यापुर्वी महाराष्ट्रात एका आरोपीने बलात्कार केला होता. आम्ही फास्टट्रॅक खटला चालवला. दोन महिन्यात आरोपीला फाशीची शिक्षा झाली’. इतकी जबरदस्त थाप मारलेली मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकली! कुणी सांगू शकेल का गेल्या चार महिन्यात महाराष्ट्रात कुणाला फाशीची शिक्षा झालेली आहे? इतक्या संवेदनशील विषयावर अशा थापा मारणारा नराधम माणूस म्हणवून घ्यायच्या लायकीचा नाही”.