तरुणाईमध्ये रॅपर बादशाहचं क्रेझ खूप आहे. त्याने एकापेक्षा एक सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली. त्याच्या प्रत्येक रॅपला तसेच गाण्यांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आपल्या कलेच्या जोरावर त्याने आज कलासृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. बादशाहची लाईफस्टाईल, त्याचे कपडे, त्याची स्टाईल सारं काही हटके असतं. तरुण मंडळी तर त्याचा प्रत्येक लूक पाहून प्रेरित होतात. इतर कलाविश्वातील मंडळींप्रमाणेच त्याला देखील महागड्या वस्तूंची आवड असावी. म्हणूनच की काय त्याने स्वतःलाच एक महागडं गिफ्ट केलं आहे. त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
बादशाहने ऑडी Q8 कार खरेदी केली आहे. या कारची किंमत चक्क कोटी रुपयांच्या घरात आहे. बादशाहने स्वतः कारसोबतचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत यासंदर्भात माहिती दिली. “अगदी माझ्यासारखीच ही कार आहे, या कारसोबत एक नवा प्रवास सुरु करण्यास मी फार उत्साही आहे.” असं बादशाहने हा फोटो शेअर करताना म्हटलं आहे. बादशाहने स्वतःलाच इतकी महागडी कार गिफ्ट करत सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे.
आणखी वाचा – VIDEO : स्विमिंग पूलमध्ये पतीसोबत रोमान्स करताना दिसली शेफाली, बोल्ड लूक पाहून लोक म्हणाले…
बादशाहने कारसोबतचा फोटो शेअर करताच त्याच्या चाहत्यांनी त्याला अभिनंद करायला सुरुवात केली. तसेच काही तासांमध्येच त्याच्या या पोस्टवर कमेंट्स, लाईकचा वर्षाव झाला. तर काही चाहत्यांनी नवीन गाडी खरेदी केल्याबद्दल पार्टी पाहिजे अशा प्रकारच्या मजेशीर कमेंट्स देखील केल्या. बादशाहने खरेदी केलेल्या या गाडीची किंमत तब्बल १ कोटी २३ लाख रुपये इतकी आहे.
आणखी वाचा – Photos : ६ वर्ष प्रेमाची…; पतीच्या प्रेमात आकंठ बुडाली सोनम कपूर, शेअर केले सुंदर रोमँटिक फोटो
जॅकेट आणि काळ्या रंगाची पँट बादशाहने परिधान केली असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद दिसत आहे. भारतातील ऑडी कारचे प्रमुख बलबीर सिंह ढिल्लो यांनी देखील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बादशाहसोबतचा फोटो शेअर केला आहे. फक्त ऑडीच नव्हे तर बादशाहकडे इतर महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.