मंगळवारी प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं कोलकाता येथे आकस्मिक निधन झालं. त्यानंतर चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर केकेला श्रद्धांजली वाहिली. यासगळ्यात केकेला श्रद्धांजली वाहिल्यामुळे रॅपर बादशाहला ट्रोल करण्यात आले. यावर बादशाहने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
बादशाहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर केकेचा फोटो शेअर करत का असे कॅप्शन दिले. हे पाहिल्यानंतर नेटकऱ्याने बादशाहला तू कधी मरणार असा मेसेज केला. नेटकऱ्याच्या या मेसेजचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत बादशाह म्हणाला, एक सेलिब्रिटी म्हणून त्याला दररोज अशा द्वेषपूर्ण मेसेजचा सामना करावा लागतो. यानंतर बादशाहने आणखी एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत तो म्हणाला, “तुम्ही जे पाहता ते एक भ्रम आहे, तुम्ही जे ऐकता ते खोटं आहे, कोणीतरी तुम्हाला भेटण्यासाठी मरत आहे, तर कोणी तुमच्या मरण्यासाठी प्रार्थना करत आहे”, असे कॅप्शन त्याने दिले आहे.
आणखी वाचा : ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचं राज ठाकरेंकडून कौतुक, प्रवीण तरडेंसोबत दोन तास गप्पा
आणखी वाचा : ‘केके’चा स्टेजवरील शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ व्हायरल; पाहा नेमकं काय घडलं
बादशाह हा बॉलिवूडमधील लोकप्रिय रॅपर्सपैकी एक आहे. बादशाहने आता पर्यंत ‘जुगनू’, ‘मर्सी’, ‘पागल’, ‘गेंदा फूल’, ‘डीजे वाले बाबू’, ‘प्रॉपर पटोला’, ‘काला चश्मा’ ही गाणी गायली आहेत.