सध्या ७४वा ब्रिटीश अकॅडमी पुरस्कार सोहळा म्हणजे BAFTA पुरस्कार सोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यात असं काही घडलं की ज्यामुळे प्रेक्षक भावूक झाले. या पुरस्कार सोहळ्यात दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांना आदरांजली वाहण्यात आली.
या मानाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या केलेल्या सन्मानामुळे त्यांचे चाहते भावूक झाले आहेत. अनेकांनी ट्विट करत याबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक चाहता म्हणतो, “माझं मन ऋषी आणि इरफान यांच्या आठवणीने भरुन गेलं”. तर एकाने लंचबॉक्स या चित्रपटातील इरफानची एक व्हिडिओ क्लिप शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. इरफानच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या दोघांच्याही आंतरराष्ट्रीय चाहत्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
#IrrfanKhan & #RishiKapoor among the #BAFTA “In Memoriam” tributes – their work appreciated from Indian film screens to a much wider audience #BAFTAs #film pic.twitter.com/lFup2QBmWD
— Tejinder Kaur (@TejinderITV) April 11, 2021
या पुरस्कार सोहळ्यात जो व्हिडिओ दाखवण्यात आला, त्यात प्रिन्स फिलीपलाही आदरांजली वाहण्यात आली. या व्हिडिओमध्ये इरफान यांच्या हॉलिवूडमधल्या लाईफ ऑफ पाय या चित्रपटातील एक सीनही दाखवण्यात आला. इरफान यांचं गेल्या वर्षी २९ एप्रिल रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. त्याच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी ऋषी कपूर यांचंही निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते.
आणखी वाचाः वडिलांच्या आठवणीत इरफान खानच्या मुलाला स्टेजवरच कोसळले रडू
BAFTAकडून जॉर्ज सेगल, सिन कॉनरी, याफेट कोट्टो, बार्बरा विंडसर, चॅडविक बॉसमन यांच्यासह अनेकांचा गौरव करण्यात आला. हा सोहळा लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री आणि आताची आंतरराष्ट्रीय कलाकार प्रियांका चोप्रा जोनस सहभागी झाली होती. करोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन पद्धतीने कलाकारांना सन्मानित करण्यात आले.