‘बाहुबली’ फेम राणा दग्गुबाती मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. राणा डग्गुबतीनं २०२०मध्ये मिहिका बजाजसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर मागच्या काही दिवसांपासून मिहिका प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. ज्यावर आता मिहिकानं स्पष्टीकरण देत मौन सोडलं आहे. मिहिका बजाजची ही प्रतिक्रिया सध्या सगळीकडे चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वीच मिहिकानं तिच्या इन्स्टाग्रामवर पती राणा डग्गुबतीसोबत एक फोटो शेअर केला होता. दोघांनी कुणाच्या तरी लग्नाला हजेरी लावली होती आणि त्या लग्नातील हा या दोघांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला होता. या फोटोमध्ये मिहिकाचं वाढलेलं वजन पाहून अनेकांनी ती प्रेग्नन्ट असल्याचं म्हटलं होतं. राणा डग्गुबती लवकरच बाबा होणार अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. यावर आता मिहिकानं प्रतिक्रिया दिली आहे.

Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Tuljabhavani Devi, Shakambhari Navratri festival,
धाराशिव : तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास ७ जानेवारीपासून प्रारंभ
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?
Archana Puran Singh reveals how Rekha responded when she asked about the mystery man in her life
अर्चन पूरन सिंगने रेखा यांना त्यांच्या आयुष्यातील ‘त्या’ मिस्ट्री मॅनबद्दल विचारलेला प्रश्न, काय उत्तर मिळालेलं? वाचा

आणखी वाचा- आता कशी आहे अपघातात जखमी झालेल्या मलायकाची प्रकृती? बहीण अमृतानं दिली माहिती

मिहिकाच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत तिच्या प्रेग्नन्सीबद्दल विचारणा केली होती. यावर उत्तर देताना मिहिकानं प्रेग्नन्सीचं सत्य उघड केलं आहे. एका युजरच्या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, ‘नाही मी प्रेग्नन्ट नाहीये. फक्त लग्नानंतर माझं वजन काहीसं वाढलं आहे.’ मिहिकाच्या या उत्तरावरून समजून येतं की या दोघांनीही अद्याप कोणतंही फॅमिली प्लानिंग केलेलं नाही.

दरम्यान आता राणा डग्गुबती आणि मिहिका बजाज यांच्या लग्नाला जवळपास २ वर्षं झाली आहे. २०२० मध्ये या दोघांनीही लग्नगाठ बांधली होती. ज्याची बरीच चर्चा झाली होती. या दोघांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते.

Story img Loader