सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि प्रभासचे काका कृष्णम राजू यांचं रविवारी (११ सप्टेंबर) निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. कृष्णम राजू यांची तब्येत खालावल्यानंतर त्यांना शनिवारी (१० सप्टेंबर) हैद्राबाद येथील एआयजी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पण काल (११ सप्टेंबर) त्यांनी रुग्णालयामध्येच अखेरचा श्वास घेतला. कृष्णम यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीही हळहळली. तसेच प्रभासही आपल्या काकांच्या निधनानंतर कोलमडून गेला.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ब्रेक घेत ‘या’ अभिनेत्यासह प्राजक्ता माळी लंडनला रवाना, म्हणाली, “माझ्या मित्राबरोबर…”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आज हैद्राबाद येथे कृष्णम राजू यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. आपल्या काकांच्या अंतिम दर्शनासाठी प्रभासही पोहोचला. मात्र यावेळी त्याचे अश्रू अनावर झाले. काकांच्या निधनानंतर तो पूर्णपणे कोलमडून गेला असल्याचं दिसून आलं. प्रभासचे यादरम्यानचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कृष्णम यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. प्रभासचं आपल्या काकांशी घट्ट नातं होतं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील बरेच कलाकार त्यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचले. यावेळी चिरंजीवी, महेश बाबू, अल्लू अर्जुन तिथे उपस्थित होता. अल्लूला पाहताच प्रभास त्याला मिठी मारुन ढसाढसा रडू लागला.

यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. कृष्णम यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. इतकंच नव्हे तर राजकारणातही त्यांचा सहभाग होता. आजवर १८० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. जवळपास पाच दशकं त्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं.

Story img Loader