‘बाहुबली’ या टॉलीवूडपटाने आत्तापर्यंत फक्त बॉलीवूडची मक्तेदारी असणाऱ्या ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करत तमाम चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर या चित्रपटातील कलाकार आणि इतर गोष्टींविषयी इंडस्ट्रीत मोठ्याप्रमाणावर चर्चा होऊ लागली आहे. ‘बाहुबली’मधील व्हिज्युअल इफेक्ट्स चित्रपटाच्या यशात महत्त्वपूर्ण ठरले असले तरी या चित्रपटातील ताकद आणि असाधारण शक्तीच्या बाहुबलीने प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर केले. त्यामुळे आत्तापर्यंत फक्त दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत चर्चेत असणारा प्रभास राजू थेट बॉलीवूडमधील नायकांच्या पंगतीत येऊन बसला आहे. बॉलीवूडमधील नायकांच्या असणारे ग्लॅमर आपसूकच प्रभासच्या वाट्याला आले असून सध्या त्याच्या खासगी जीवनाविषयी तमाम चित्रपट चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषत: प्रभासच्या फिमेल फॉलोइंगमध्ये मोठी भर पडली होती. मात्र, नुकत्याच हाती आलेल्या प्रभासच्या लग्नाच्या बातमीने या सर्व फिमेल फॅन्सचा काहीसा हिरमोड झाला आहे. प्रभास डिसेंबर महिन्यात त्याच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान असणाऱ्या मुलीशी विवाहबद्द होत असल्याने त्याच्या चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. कुटुंबियांच्या पसंतीने प्रभासचे लग्न अनेक महिन्यांपूर्वीच ठरले होते. मात्र, ‘बाहुबली’च्या चित्रीकरणामुळे प्रभासच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली होती. विशेष म्हणजे प्रभासची होणारी पत्नी चित्रपटांच्या दुनियेशी संबंधित नसून ती एक सर्वसामान्य मुलगी असल्याचे सांगण्यात येत आहे. ती सध्या दक्षिणेकडील एका महाविद्यालयात अभियांत्रिकेचे शिक्षण घेत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा