सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला. चित्रपटात रणवीर सिंग बाजीरावांची भूमिका साकारत असून, दीपिका पदूकोण मस्तानीच्या, तर प्रियांका चोप्रा काशीबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, चित्रपटाचा फर्स्ट लूक बुधवारी प्रदर्शित करण्यात आला होता. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करत असलेल्या या ऐतिहासिक चित्रपटातील कलाकारांच्या मोहवून टाकणाऱ्या फर्स्ट लूकनंतर आता चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आला आहे. सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटासह ‘बाजीराव मस्तानी’चा ट्रेलर मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे.
‘बाजीराव मस्तानी’मध्ये रणवीर, प्रियांका आणि दीपिका यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनावेळीच म्हणजेच १८ डिसेंबरला शाहरुख-काजोलचा ‘दिलवाले’ देखील प्रदर्शित होणार आहे.

‘बाजीराव मस्तानी’चा ट्रेलर पाहाण्यासाठी येथे क्लिक करा

Story img Loader