संजय लीला भन्सालींचा ‘बाजीराव-मस्तानी’ अनेक कारणांनी वादाच्या केंद्रस्थानी सापडला असला, तरी या चित्रपटाने नुकत्याच झालेल्या सोनी गिल्ड पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार मिळवत बाजी मारली. मंगळवारीच हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईमध्ये झाला.
या पुरस्कार सोहळ्यात ‘बाजीराव-मस्तानी’त पेशव्यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रणवीर सिंग याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारही संजय लीला भन्साली यांनीच मिळवला. याच चित्रपटात मस्तानीची भूमिका साकारणाऱ्या दीपिका पदुकोण हिला तिच्या ‘पिकू’ या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
सोनी गिल्ड पुरस्कार सोहळ्यात ‘बाजीराव-मस्तानी’ने एकूण ९ पुरस्कार मिळवले. यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट छायांकन, सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन याचा समावेश आहे.
अभिनेता सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाने या सोहळ्यात चार पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही याच ‘बजरंगी भाईजान’लाच मिळाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा