अलिकडेच प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचा नेमका वेध घेतला आहे. सुरुवातीच्या आठवड्यातच भरघोस यश संपादन करून या चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान पटकावले. केवळ सलमान खान आणि बाल कलाकार हर्षाली चित्रपटाचे आकर्षण नसून, नवाझुद्दीन सिद्दीकीने साकारलेल्या चाँद नवाब व्यक्तिरेखेनेसुद्धा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटातील त्याची ही व्यक्तिरेखा याच नावाच्या पाकिस्तानी पत्रकारावर आधारित आहे. सहा वर्षांपूर्वी पाकिस्तानी पत्रकार चाँद नवाबचा धमाल व्हिडिओ इंटरनेटवर खूप लोकप्रिय झाला होता. त्याचाच आधार घेत चित्रपटात नवाझुद्दीनची चाँद नवाब म्हणून ओळख करून देताना दिग्दर्शक कबीर खानने दृश्य साकारले आहे.
चित्रपटातील हा चाँद नवाब पवनला (सलमान खान) त्याच्या प्रवासात मदत करताना दाखविण्यात आला आहे.

पाहा खऱ्या चाँद नवाबचा मजेशीर व्हिडिओ:

Story img Loader