‘बालिका वधू’ या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अविका गौर लवकरच टेलिव्हिजनवर परतणार आहे. ‘लाडो २- वीरपूर की मर्दानी’ या नव्या मालिकेत ती भूमिका साकारणार आहे. ‘कलर्स’ वाहिनीवरील ‘बालिका वधू’ या मालिकेत तिने आनंदीच्या लहानपणीची भूमिका साकारलेली. याच भूमिकेमुळे अविकाला भरभरून प्रसिद्धी मिळाली. ‘लाडो २’ या मालिकेत मेघना मलिक अम्माजीची भूमिका साकारणार आहे. अविकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘बालिका वधू’ या मालिकेनंतर बराच काळ सुरु असलेल्या ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत अविकाने रोलीची भूमिका साकारलेली. मात्र, चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्यासाठी तिने ही मालिका मधेच सोडली. बॉलिवूडमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका तिला मिळाल्या, पण त्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळालं नाही. ‘मॉर्निंग वॉक’, ‘पाठशाला’ आणि ‘तेज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकलेली. काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही तिने अभिनय कौशल्य दाखवले. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उय्याला जम्पाला’ या तेलुगू चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. यासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला होता.

वाचा : लैंगिक शोषणाविरोधात रिचा चड्ढानेही उठवला आवाज; समाजाच्या दुटप्पी भूमिकेवर केले भाष्य

बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळालं नसलं तरी दाक्षिणात्य चित्रपटांमुळे अविका चांगलीच प्रसिद्ध झाली. ‘लक्ष्मी रावे मा इंटिकी’, ‘चूपिस्ता मावा’, ‘थानू नेनू’ या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ती झळकली.