मराठी चित्रपटसृष्टीत सध्या पुन्हा एकदा ऐतिहासिकपटांची लाट आली आहे. प्रकाश पवार दिग्दर्शित ‘बलोच’ हा आणखी एक ऐतिहासिकपट ५ मे रोजी राज्यभरात प्रदर्शित झाला आहे. बलुचिस्तानात झालेल्या लढाईत मराठय़ांच्या पदरी अपयश आले होते, परिणामी त्यांना गुलामगिरी पत्करावी लागली होती. बलुचिस्तानातील गुलामगिरीवर मात करून जिद्दीने विजयाचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या मराठय़ांच्या रोमांचकारी लढाईवर आधारित असलेल्या ‘बलोच’ चित्रपटाच्या चमूने ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात भेट देऊन गप्पा मारल्या.

गुलामीतल्या मराठय़ांची गोष्ट म्हणजे ‘बलोच’

दरवेळी आपल्याला जो इतिहास हवा आहे किंवा आपल्याला जो ऐकायला बरा वाटतो तो इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला जात असतो. कुणी स्वत:चं अपयश पटकन सांगत नाही, परंतु पानिपताच्या अपयशानंतर मराठय़ांना जायबंदी केले गेले आणि त्या गुलाम बनवलेल्या मराठय़ांना वाळवंटातून कित्येक महिने फरफटत नेले गेले. अशा या गुलामीतल्या मराठय़ांची गोष्ट आणि मराठय़ांच्या शौर्याचा इतिहास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी केला आहे, असे अभिनेता प्रवीण तरडे यांनी सांगितले. या चित्रपटाचे संपूर्ण श्रेय चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार यांचे असल्याचे सांगतानाच लागोपाठ ऐतिहासिक भूमिका करण्यामागचे कारणही तरडे यांनी स्पष्ट केले. ‘गेल्या वर्षभरात मला केवळ ऐतिहासिक चित्रपटांसाठीच विचारणा झाली. कदाचित माझे दिसणे हे सध्या ऐतिहासिक भूमिकांना साजेसे असेल म्हणून माझ्याकडे या भूमिका येत असतील. आपल्याला ऐतिहासिकपटातही सतत छाती काढून चालणारा, दोन्ही हातात तलवारी घेऊन पराक्रम गाजवणारा मराठा दिसतो, यात मात्र पडेल खांद्याने वावरणारा, दाढी केस वाढलेला मराठा पाहायला मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

rahul gandhi arvind kejriwal (1)
‘या’ धर्मातील नागरिकांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, मोफत तीर्थयात्रा घडवणार; केजरीवालांवर भेदभावाचे आरोप
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Guardian Minister Shivendra Singh Raje Bhosle Mitra Mandal circle of friends latur
लातूरामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाची ‘अचानक’ स्थापना
Republic Day 2025 Wishes SMS Messages Quotes in Marathi
Republic Day 2025 Wishes : प्रजासत्ताक दिनाला द्या हटके शुभेच्छा, प्रियजनांना पाठवा एकापेक्षा एक हटके संदेश
Sandeep Deshmukh Wardha district Ajit Pawar NCP group
वर्धा जिल्ह्यात सहकार गटात उभी फूट, एकाच घरी दोन झेंडे
Uddhav Thackeray-Sharad Pawar meeting,
उद्धव ठाकरे-शरद पवार यांची भेट, महाविकास आघाडीची लवकरच बैठक होणार
Ajit Pawar announce property tax discount for disabled
अपंगांना मालमत्ताकरात ५० टक्के सवलत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
Maha Kumbh Mela
Maha Kumbh Mela 2025 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ८००० विद्यार्थ्यांना घडवणार ‘कुंभ दर्शन’, नेमका उद्देश काय?

 पाकिस्तान सीमेजवळील चित्रीकरणाचा अनुभव अविस्मरणीय

‘बलोच’चे चित्रीकरण जैसलमेर येथे झाले आहे, जिथून पाकिस्तानची सीमा दिसत होती. या चित्रीकरणाचा अनुभव फारच वेगळा होता अशी भावना अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली.

चित्रीकरण सुरू  असताना पाकिस्तानच्या सीमेजवळ पाकिस्तानी उभे असायचे, त्यावेळी मुद्दाम त्यांना ऐकू जाईल इतक्या मोठय़ा आवाजात छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा आम्ही द्यायचो, असा किस्सा प्रवीण तरडे यांनी सांगितला. ५० डिग्री सेल्सिअस तापमानात जैसलमेरच्या वाळवंटात चित्रीकरण करताना शरीर अगदी होरपळून निघायचे, मात्र शेवटी मराठे असल्याने जिद्दीने आम्ही सर्वानी ते चित्रीकरण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याचेही त्यांनी सांगितले.

दाक्षिणात्य चित्रपटातही झळकणार..

लेखक – दिग्दर्शक म्हणून विषयाच्या बाबतीत चोखंदळपणा जपणाऱ्या प्रवीण तरडे यांनी अभिनेता म्हणून काम करताना भूमिका किती आवडली आणि त्याचा मोबदला किती मिळणार याचाही विचार करत असल्याचे स्पष्टपणे सांगितले. कित्येकदा भूमिका आवडली नसली तरी त्याचा मोबदला अधिक असल्यानेही भूमिका स्वीकारली असल्याचे स्पष्ट करतानाच नुकतीच दाक्षिणात्य चित्रपटातही नकारी व्यक्तिरेखा साकारली असल्याचे सांगत दक्षिणेतील आपल्या पदार्पणाची माहितीही तरडे यांनी दिली. एक अभिनेता – दिग्दर्शक म्हणून ठरावीक समूहासाठी चित्रपट न करता तो सगळय़ा स्तरात पोहोचणारा असेल तरच त्यात अर्थ असतो ही आपली भूमिकाही त्यांनी मांडली.

 प्रेक्षक फार चोखंदळ झाले आहेत

कोणताही चांगला, मोठा आणि उत्तम चित्रपट असला तर प्रसिद्धी करण्याची जास्त गरज लागत नाही, प्रेक्षकांपर्यंत तो आपोआप पोहोचतो, असे निर्माते अमोल कांगणे यांनी सांगितले. करोनाकाळानंतर निर्मिती क्षेत्रात आणि मराठी मनोरंजनसृष्टीत फार बदल झाल्याचे सांगतानाच चित्रपटाकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोनही बदलला असल्याचे त्यांनी सांगितले. करोनाआधी प्रत्येक चित्रपटाला आपला एक प्रेक्षकवर्ग होता. अलीकडे प्रेक्षक फार चोखंदळ झाले आहेत. चित्रपटाची किती प्रसिद्धी केली आहे याविषयी त्यांना सोयरसुतक नसते, त्यांना जो चित्रपट पाहावासा वाटतो तोच ते पाहतात. त्यामुळे अनेकदा कमी निर्मिती खर्चात केलेल्या एका चांगल्या कथेवरचा चित्रपट असला तरी तो चित्रपटगृहात जास्त टिकत नाही, याकडेही कागणे यांनी लक्ष वेधले.

चित्रपटांना चित्रपटगृह मिळवून देण्यासाठी दिग्दर्शकाचे प्रयत्नही गरजेचे

चित्रपट हा व्यवसाय आहे, इथे नफ्या-तोटय़ाचे गणित पाहूनच निर्माते आणि दिग्दर्शक या क्षेत्रात येतात असे प्रवीण यांनी सांगितले. तसेच, चित्रपट प्रदर्शित करण्याआधी लेखक-दिग्दर्शकांनीही महाराष्ट्रात कुठे कुठे चित्रपटगृहे आहेत याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

बहुपडदा चित्रपटगृहांच्या जंजाळात एकपडदा चित्रपटगृह झाकोळले गेले आहेत. ही एकपडदा चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्यासाठी लेखक – दिगर्शकांचे प्रयत्नही गरजेचे असल्याचे तरडे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील तळागाळातील नागरिकांशी दिग्दर्शकाने संवाद साधला तर प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यासाठी त्याचा लाभ होऊ

शकतो, याकडेही तरडे यांनी लक्ष वेधले. पानिपतच्या लढाईनंतर अपयशाने झुकलेल्या मराठय़ांची गुलामीतील अवस्था कशी होती आणि त्यावेळीही मराठय़ांनी काय शौर्य गाजवले याचा इतिहास सांगणारा चित्रपट आत्तापर्यंतच्या ऐतिहासिकपटांमध्ये एक वेगळा प्रयोग ठरेल, असा विश्वासही चित्रपटाच्या चमूने यावेळी व्यक्त केला.

Story img Loader