गेलं दोन वर्ष अवघ्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेचे शिर्षकगीत अजूनही घराघरांत तितकंच लोकप्रिय आहे. बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेचे ८०० हून अधिक भाग पूर्ण झाले असून, आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर या मालिकेचे शिर्षकगीत एका नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. जो अजूनही कायम आहे. अगदी पहिल्या भागापासून ते आतापर्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर रहाण सोपे नाही, यामध्ये संपूर्ण टीमचा मोलाचा वाटा आहे. अवघा महाराष्ट्र “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” या जयघोषाने दुमदुमला. संत देवतावतारी बाळूमामा या नावच एक वेगळंच वलय आहे. याच थोर संताची कथा कलर्स मराठी वाहिनीच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रासमोर मांडण्याचं शिवधनुष्य उचललं संतोष अयाचित यांनी.

आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आलेलं हे नव्या ढंगातलं शिर्षकगीत अगदीच खास आहे. हे शिर्षकगीत बाळू मामांच्या भक्तांच्या आणि प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.

या मालिकेच्या निमित्ताने संत बाळू बाळू मामा यांचा महिमा घराघरात पोहचला. बाळूमामांच्या चरित्रगंथातील मामांच्या लीला, त्यांनी ज्या भक्तांचा उध्दार केला अश्या कथा आजावर आपण मालिकेत पाहिल्या. अश्याच अजुन सुरस कथा मालिकेच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीस येत्या काळातही येणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balumamachya navane changbhal serial new title song on ashadhi ekadashi kpw