ओम राऊत दिग्दर्शित आणि मनोज मुंतशिर लिखित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट त्याचा पहिला टीज गेल्या वर्षी रिलीज झाला तेव्हापासून वादात आणि चर्चेत आहे. प्रत्यक्ष चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यातील संवाद, पात्र, व्यक्तीरेखा, अभिनय, पात्रांची वेशभूषा या सर्वच बाबतीत प्रेक्षकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. प्रेक्षकांच्या तीव्र भावना पाहाता मनोज मुंतशिर यांनी लिहिलेले काही संवादही बदलण्यात आले. पण आता पुन्हा एकदा चित्रपट अडचणीत येण्याची शक्यता आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नुकतंच ‘आदिपुरुष’ चित्रपटावरून अलाहाबाद उच्च न्यायालयानं निर्मात्यांना परखड शब्दांत सुनावलं होतं. “हिंदू सहनशील म्हणत त्यांच्या सहनशीलतेचा अंत का पाहाताय?” असा सवालच अलाहाबाद उच्च न्यायालयाने आदिपुरुष चित्रपटाच्या निर्मात्यांना केला आहे. या प्रकरणाची सुनावणी प्रलंबित असताना आता चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका ममता रानी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. हा चित्रपट हिंदू समाजाच्या भावनांना प्रचंड धक्का पोहोचल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

याचिकेत नेमकं काय म्हटलंय?

चित्रपटात रामायणाच्या कथेला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. याशिवाय, राम व हनुमान यांची वागणूक आणि बोलण्याची पद्धत यांचं विकृत चित्रण चित्रपटात करण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. शिवाय, सीतेचं सादरीकरणही चुकीचं आणि अश्लील पद्धतीने करण्यात आल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

Adipurush Hearing: “हिंदूंच्या सहनशीलतेची कसोटी का पाहताय? नशीब त्यांनी…”, उच्च न्यायालयानं चित्रपट निर्मात्यांना सुनावलं!

संवादांवर तीव्र आक्षेप

दरम्यान, चित्रपटात हनुमानाच्या तोंडी असणारे संवाद कधीच भारताच्या सभ्य समाजात वापरले गेले नाहीत, असे संवाद फक्त गल्लीतल्या टपोरी लोकांकडून वापरले जातात, असंही याचिकेत म्हटलं आहे. “या चित्रपटाची प्रेरणा वाल्मिकी रामायणापासून घेण्यात आली. पण रामायण त्रेतायुगात घडलं असं मानलं जातं. या काळात राक्षस आणि देवता पृथ्वीवर एकत्र राहायचे आणि एकमेकांशी युद्ध करायचे. पण तरीही युद्धाची किमान नीतीमूल्ये पाळली जायची. आक्षेपार्ह व अपमानास्पद शब्द कधीच कुणासाठीही प्रेरणा ठरू शकत नाहीत”, अशी तक्रारही याचिकेत करण्यात आली आहे.

आदिपुरुष: नेमकं गणित कुठे बिघडलं? पाहा चित्रपटात काय चुकलं!

याचिकाकर्त्या ममता रानी यांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली असून त्याच्या सुनावणीची तारीख अद्याप न्यायालयाने दिलेली नाही.