बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर हा लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. करणने २५ मे रोजी त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने करणने एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती. कलाकरांचे पार्टीतले फोटो व्हायरल होत असताना अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

ट्विंकलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्विंकलने पार्टीला जाण्याआधी आणि पार्टीला गेल्यानंतर अशा दोन्ही बाजू दाखवल्या आहेत. सुरुवातीला ट्विंकल व्हाइट टॉप आणि ब्लेजरमध्ये दिसत आहे. यावेळी ती फोटोग्राफर्ससाठी पोज कशा देतात ते दाखवताना दिसत आहे. त्यानंतर पार्टी करुन आल्यावर कशा प्रकारे डोके दुखीला सुरुवात होते हे तिने दाखवले आहे. या व्हिडीओला ट्विंकलने व्हॉइस ओवर देखील दिला आहे. व्हिडीओमध्ये ट्विंकल तिच्या ऑफिसमध्ये डोक्याला हात लावून झोपलेली दिसत आहे. त्यावेळी तिने करण जोहरला आणि त्याच्या पार्टीज बॅन करा, शायनी स्कर्ट्स आणि फ्रीच्या ड्रिंक्स बंद करा. हँगओवर तुझ्या फ्री ड्रिंकमुळे आहे.

आणखी वाचा : “शूटिंग दरम्यान अनोळखी व्यक्तिने २१ लाख रुपये देऊ केले तर…”, प्रवीण तरडेंनी सांगितला तो किस्सा

आणखी वाचा : अभिजित आणि सुखदा खांडकेकर यांनी नवीन घरात केला गृह प्रवेश, पाहा फोटो

ट्विंकलने हा व्हिडीओ शेअर करत, ‘आजची ऑफिसमधली सकाळ काही अशा प्रकारची होती. मी वर्षातून एकदा पार्टीला जाते. मला विश्वास बसत नाही की लोक रोज पार्ट्या कशा करतात’ असे असे कॅप्शन दिले.

Story img Loader