अंबानी कुटुंबीय आपल्या नव्या सुनेचं स्वागत करण्यासाठी आता सज्ज झाले आहेत. अनंत व राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा येत्या १२ जुलैला पार पडणार आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या भव्य लग्नसोहळ्याचं तीन दिवस आयोजन करण्यात आलं आहे. अनंत-राधिकाची लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लग्नात काय-काय खास असणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. अशातच आता अंबानी कुटुंबीयांनी लग्नात ठरवलेला वेडिंग मेन्यू नेमका काय असेल याबद्दल माहिती समोर आली आहे.

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात वाराणसीमधला प्रसिद्ध काशी चाट भांडार स्टॉल लावण्यात येणार आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी लेकाच्या लग्नापूर्वी जून महिन्यात काशी विश्वनाथाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं. यानंतर त्यांनी जवळपासच्या दुकानांना भेट दिली होती. यावेळी नीता अंबानी यांनी वाराणसीच्या विविध पदार्थांचा आस्वाद घेतला होता.

David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
Zomato's Deepinder Goyal offers job to Bengaluru man on X
झोमॅटोच्या फूड रेस्क्यूबाबत ग्राहकाने मांडले मत, सीईओ गोयल यांनी दिली थेट नोकरीची ऑफर, पोस्ट चर्चेत
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
supreme court rejects sebi penalty on mukesh ambani In rpl shares case
सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!

एनआयने दिलेल्या माहितीनुसार, नीता अंबानी यांनी राकेश केशरी यांच्या दुकानातील चाटचे (Chaat) विविध प्रकार खाऊन पाहिले. या पदार्थांची चव घेतल्यावर त्यांनी दुकानाचे मालक केशरी यांना लेकाच्या लग्नासाठी आमंत्रित केलं आहे. केशरी यांच्या टीमला लग्नात टिक्की, टोमॅटो चाट, पालक चाट, चना कचोरी आणि कुल्फी असे पदार्थ बनवण्यास सांगितलं जाणार आहे.

हेही वाचा : Video: मामेरू कार्यक्रमाला ‘अशी’ झाली अंबानींच्या होणाऱ्या लाडक्या सूनेची जबरदस्त एन्ट्री, सुंदर लूकने वेधलं लक्ष

“नीता अंबानी २४ जून रोजी आमच्या चाट भंडारमध्ये आल्या, त्यांनी टिक्की चाट, टोमॅटो चाट, पालक चाट आणि कुल्फी फालूदा खाल्ला. त्या खूप खूश झाल्या आणि म्हणाल्या, ‘बनारसच्या चाटचे विविध प्रकार जगभरात प्रसिद्ध आहेत” अशी माहिती केशरी यांनी एएनआय दिली आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न पारंपारिक हिंदू पद्धतीनुसार होणार आहे. हे जोडपं १२ जुलै रोजी लग्नगाठ बांधेल. लग्नाच्या दिवशी, पाहुण्यांसाठी खास पारंपरिक थीम ठेवण्यात आली आहे. राधिका मर्चंट ही एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजक शैला मर्चंट यांची मुलगी आहे.

हेही वाचा : “निशाणा तुला दिसला ना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे अन् निखिल बनेचा हटके डान्स, नेटकरी म्हणाले…

दरम्यान, यापूर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगर येथे आयोजित करण्यात आला होता. तर, या जोडप्याचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा मे महिन्याच्या अखेरीस इटलीत पार पडला होता. जामनगरला रिहाना, दिलजीत दोसांझ, अरिजित सिंहसारख्या सेलिब्रिटींनी परफॉर्मन्स केले होते. दोन्ही सोहळ्यांना बॉलीवूडकलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली होती.