बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रणवीरने कमी कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रणवीरचा पहिला चित्रपट ‘बँड बाजा बारात’ (Band Baaja Baaraat) होता. या चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) रणवीरसोबत मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात त्या दोघांमध्ये एक सेक्स सीनही दाखवण्यात आला होता. दरम्यान, एका मुलाखतीत रणवीरने चित्रपटातील सेक्स सीन विषयी वक्तव्य केले होते..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटातील रणवीर आणि अनुष्काची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. २०११ मध्ये Simi Selects India’s maximum desirable मुलाखतीत, रणवीरने अनुष्कासोबत सेक्स सीनवर वक्तव्य केले होते. अनुष्कासोबत असलेल्या सेक्स सीनविषयी रणवीर म्हणाला होता की, “मी अनुष्कासोबत पुन्हा सेक्स सीन करू शकतो कारण ती खूप सपोर्टिव्ह सहकलाकार आहे.”

आणखी वाचा : सलमानकडे कपडे घ्यायला नव्हते पैसे, तेव्हा सुनील शेट्टीने केली होती ‘अशी’ मदत

आणखी वाचा : ‘या’ ३ राशींच्या लोकांवर असतो कुबेर देवाचा आशीर्वाद

दरम्यान, रणवीरने दीपिका पदुकोणसोबत लग्न केले आहे. तर, अनुष्काने क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली आहे. अनुष्का आणि विराटला एक मुलगी देखील आहे, जिचे नाव वामिका आहे. रणवीरचा जयेश भाई जोरदार हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. याशिवाय रणवीर ‘सर्कस’, ‘सिम्बा 2’, ‘तख्त’, ‘अन्नियन बॉलिवूड रीमेक’ या चित्रपटात दिसणार आहे. तर, अनुष्का ‘चकडा एक्स्प्रेस’ आणि ‘कनेडा’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Band baja baaraat ranveer singh said he can shoot sex scene with anushka sharma again dcp