‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात पोहोचलेले ‘भावोजी’ अर्थात अभिनेते, सूत्रसंचालक आदेश बांदेकर आता लवकरच ‘नांदा सौख्यभरे’या नव्या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या ‘सोहम एन्टरटेन्मेंट’ने या मालिकेची निर्मिती केली आहे. २० जुलैपासून सोमवार ते शनिवार या दिवशी दररोज सायंकाळी साडेसात वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवरून मालिकेचे प्रसारण होणार आहे.
या मालिकेत सुहास परांजपे, ऋतुजा बागवे, चिन्मय उदगीरकर हे प्रमुख भूमिकेत असून सध्या या मालिकेची जाहिरात ‘झी मराठी’वरून दाखवायला सुरुवात झाली आहे. भिन्न स्वभावाची सासू आणि सून मालिकेच्या केंद्रस्थानी असून मालिकेतील देशपांडे व जहागीरदार कुटुंबात घडणारे कथानक यात मांडण्यात आले आहे.

Story img Loader