सध्याच्या युगात मोबाईल, इंटरनेट,सोशल मिडिया यांचा वापर वाढत चाललेला आहे त्यामुळे आजची पिढी  टेक्नोसॅव्ही होत चाललेली आहे. मात्र या वाढत्या टेक्नोसॅव्हीपणामुळे नात्यांमधले रेशमी बंध हळू हळू विरळ होत चालले आहे. माणसाच्या नातेसंबंधात टेक्नॉलॉजीचा वाढता प्रभाव यावर भाष्य करणारा ‘बंध नायलॉनचे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.  जतीन वागळे यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. अंबर हडप आणि गणेश पंडित यांनी लिहिलेल्या ‘बंध  नायलॉनचे’ या एकांकिकेवरील हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सोशल मिडिया, मोबाईल यांच्या मायाजाळात गुरफटलेल्या माणसाची येणाऱ्या दहा वर्षात टेक्नॉलॉजीमुळे होणारी अवस्था सिनेमात मांडली आहे.  निर्माते सुनील नायर यांच्या  झिरो हिट्स प्रा. लि. या बॅनरची निर्मिती असलेल्या या सिनेमात अभिनेता  महेश मांजेरकर, मेधा मांजरेकर, सुनील बर्वे, सुबोध भावे, संजय नार्वेकर, श्रुती मराठे, प्रांजळ परब यांच्या प्रमुख भूमिका आहेत.  कोकण, सासवड यासारख्या नयनरम्य ठिकाणी सिनेमाचे चित्रीकरणाने या सिनेमातील व्यक्तीरेखात आपलेच कुटुंब प्रेक्षकांना पाहता येईल. सिनेमाला अमितराज याचे संगीत आणि मंदार चोळकर आणि सचिन पाठक यांनी मिळून सिनेमाची गाणी लिहिली आहेत.  शिरीष देसाई यांनी छायाचित्रीकरण केले असून मोहित टाकळकर यांनी सिनेमाचे  संकलन केले आहे. नातेसंबंधावर आधारित असलेला हा सिनेमा २९ जानेवारीत प्रदर्शित होणार असून सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bandh nylonche upcoming marathi movie