शेखर फडके

मी अनेक वर्षापासून मराठी मालिका आणि चित्रपटातून काम करत आहे. मला
महारष्ट्रातील लोकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. सध्या तर मी सब वाहिनीवरील
‘चंद्रकांत चिपळूणकर सीढी बम्बावाला’ या मालिकेत काम करीत आहे. ही  मालिका मला
गेल्याच महिन्यात मिळाली. गणपतीच्या आशीर्वादामुळेच  मला इतकी  चांगली संधी
प्राप्त झाली. त्यामुळे यावेळचा गणपती खूपच खास आहे. माझ्याकडे गेले ३वर्षे
 दिड दिवसाठी गणपती येतो.
दरवर्षी यादरम्यान  मी घरीच राहण्याचा प्रयत्न करतो. यावर्षीतर मी खास सुट्टी
मागून घेतली होती. या दिवसात आमच्याकडे अनेक नातलग आणि मित्र-मैत्रिणी येतात.
या  निमित्ताने सगळ्यांना भेटायची संधी देखील मिळते. गणपती बाप्पा सगळ्यांना
भरभराट देवो, हीच मी गणपती चरणी प्रार्थना करेन!