प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. पॉप आणि रॉक म्युझिकची क्रेझ चाहत्यांच्या मनावर घर करून बसलेल्या बप्पीदाची ही बातमी ऐकून सगळ्यांचेच डोळे डोळे पाणावले आहेत. क्रिकेटर युवराज सिंग, आदित्य राज, हंसल मेहता यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांना गेल्या वर्षी त्यांनाही करोनाची लागण झाली होती. प्रतिभासंपन्न बप्पी लाहिरी यांच्या आयुष्याशी संबंधित अशा काही न ऐकलेल्या गोष्टी आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
१.इंडस्ट्रीतील सुवर्ण संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरी यांनी सुमारे साडेसहाशे चित्रपटांना संगीत दिले आहे. हिंदी, बंगाली व्यतिरिक्त त्यांनी जवळपास सर्व भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तसेच ५००० हून अधिक गाणी रचली आहेत.
२. १९८६ साली बप्पीदा यांनी ३३ चित्रपटांतील १८० गाणी रेकॉर्ड केली होती. त्याच्या या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती.
३. जगप्रसिद्ध डान्सर मायकल जॅक्सनच्या गाण्याने आणि डान्सने जगाला वेड लावले असताना, मायकल हा बप्पीदा यांच्या ‘डिस्को डान्सर’ या गाण्याचा मोठा चाहता होता.
४. बप्पीदा यांनी वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी तबला शिकण्यास सुरुवात केली आणि वयाच्या ११ व्या वर्षी संगीत कंपोज करण्यास सुरुवात केली.
५. बप्पी लाहिरी हे सोन्याचे दागिने घालण्यासाठी प्रसिद्ध होते. एका मुलाखतीत त्याने खुलासा केला होता की, त्याच्यावर एका प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचा खूप प्रभाव आहे. त्यांना पाहिल्यानंतर त्यांनी स्वत:ची स्टाइल तयार करण्यासाठी असे दागिने घालतात. ते रोज किमान ७ ते ८ चेन घालत हप्ते. ते सोन्याच्या अनेक साखळ्या घालत होते कारण सोने त्याच्यासाठी भाग्यवान होते.
(हे ही वाचा: Bappi Lahiri: बप्पी लहरींकडे नक्की किती सोनं होतं?; मालमत्तेबद्दल स्वत:च केलेला खुलासा)
६. बप्पी दा हे भारतीय चित्रपट उद्योगातील एकमेव संगीतकार होते ज्यांना पॉप संगीताच्या फ्लेवरची ओळख करून देण्याचे श्रेय दिले जाते. त्यांच्या या प्रयोगाने बॉलिवूडची दिशाच बदलली.
७. किशोर कुमार हे बप्पी लाहिरी यांचे नातेवाईक होते ज्यांनी त्यांना संगीत शिकवले तसेच बॉलीवूडमध्ये पाय रोवण्यास मदत केली.
८. बप्पी लाहिरी यांचे खरे नाव आलोकेश लाहिरी होते, ज्यांनी नंतर त्यांचे स्टेजचे नाव बदलून बप्पी लाहिरी ठेवले हे अनेकांना माहीत नसेल.
९. बप्पी लाहिरीच्या संगीताची जादू केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही होती.
१०. ‘डिस्को डान्सर’ चित्रपटातील ‘जिम्मी जिमी आजा आजा’ हे बप्पी दाचे प्रसिद्ध गाणे २००८ मध्ये आलेल्या ‘यू डोंट मेस विथ द जोहान’ या हॉलिवूड चित्रपटात समाविष्ट करण्यात आले होते. ज्युलियस डोबोस यांनी संगीत पुन्हा तयार केले होते.