प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं ६९ वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. बप्पी लहरी हे इंडस्ट्रीमध्ये ‘गोल्ड मॅन’ म्हणून ओळखले जायचे. पण तुम्हाला माहित आहे का बॉलिवूडचे लोकप्रिय गायक किशोर कुमार हे बप्पी लहरी यांचे नातेवाईक होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संगीतकार बप्पी हे किशोर कुमार यांचे भाचे होते. दोघांचे नाते हे गुरू-शिष्याचे नाते होते. कधी गुरू-शिष्य, कधी दोस्त-यार तर कधी मामा-भाचा या जोडीने बॉलिवूडला अनेक अप्रतिम गाणी दिली आहेत. ज्यांनी बप्पी लहरी यांना बॉलीवूडमध्ये एन्ट्री दिली ते दुसरे कोणी नसून किशोर कुमार होते.

आणखी वाचा : फॅन्टॅस्टिक, तुझं नाव काय आहे? बप्पी लहरींच्या गणपतीच्या चेनने केले होते मायकल जॅक्सनला आकर्षित

बप्पी लहरी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘वयाच्या २० व्या वर्षी मी ‘बढ़ती का नाम दाढ़ी’ या कॉमेडी चित्रपटात काम केले होते. मी निर्माता दिग्दर्शक किशोर कुमार यांचा भाचा होतो. त्या चित्रपटात मी छोटी भूमिका साकारली होती. तर किशोर कुमार म्हणाले की, मला वाटते की तुम्ही चित्रपटात काम करू शकता. मग मी म्हणालो की, मला हिंदी नीट बोलता येत नाही, मी कसं काम करू.’ यानंतर बप्पी लहरी यांनी अभिनय तर केला नाही, तर बॉलिवूडला अविस्मरणीय गाणी देण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले.

आणखी वाचा : “गळ्यात कच्चा बादाम अडकलाय का?” रानू मंडल यांचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी लावला कपाळाला हात

एक काळ असा होता की बॉलीवूडमध्ये ‘डिस्को डान्सर’नंतर फक्त आणि फक्त बप्पी लहरीचीच गाणी ऐकायला मिळत नव्हती. पण काहींनी बप्पी यांची लोकप्रियता पाहता त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना फक्त किशोर कुमार यांनीच पाठिंबा दिला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bappi lahiri had this relationship with kishore kumar believed to be his real guru dcp