प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. बप्पी लहरी हे इंडस्ट्रीमध्ये ‘गोल्ड मॅन’ म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी बप्पी लहरी यांनी बिग बॉस १५च्या घरात हजेरी लावली होती.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस १५’मध्ये बप्पी लहर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांचा म्यूझिक व्हिडीओ लाँच झाला होता. तेव्हा सलमान बप्पी लहरी यांच्यासोबत मजामस्ती करताना दिसला होता. दरम्यान, सलमानने ‘कभी अलविदा ना कहना’ हे गाणे बप्पी लहरी यांच्यासाठी गायिले होते. या शोमध्ये ते अखेरचे दिसले होते.
आणखी वाचा : जेव्हा राजकुमार यांनी बप्पी लहरींच्या दागिण्यांची उडवलेली खिल्ली; म्हणाले होते, “मंगळसूत्राची…”

बप्पी लहरी यांना एप्रिल २०२१ मध्ये करोना संसर्गही झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर ते काही दिवसांमध्येच बरे झाले. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रकृतीशी संबंधीत अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यांचा मृत्यू ओएसए म्हणजेच ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्नियामुळे मध्यरात्रीच्या सुमारास झाला, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. दीपक नामजोशी यांनी दिली.

Story img Loader