प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. बप्पी लहरी एक असे प्रसिद्ध संगीतकार आणि पार्श्वगायक होते. ज्यांच्या डिस्को संगीतानं लोकांना वेड लावलं होतं. बप्पी लहरी यांनी ताल वाद्यं आणि पाश्चिमात्य संगीत यांचं मिश्रण असलेली डिस्कोथेक शैली विकसित केली होती.

आपल्या नव्या प्रयोगामुळे बप्पी लहरी यांना सुरुवातीच्या काळात बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला होता. पण नंतर मात्र श्रोत्यांनी त्यांच्या या संगीताचं खूप कौतुक केलं आणि त्यांना बॉलिवूडमध्ये डिस्को किंग या नावानं ओळखलं जाऊ लागलं. २७ नोव्हेंबर १९५२ साली कोलकाता शहरात जन्मलेल्या बप्पी लहरी यांचं खरं नाव आलोकेश लहरी असं होतं. बालपणापासूनच त्यांना संगीताची विशेष आवड होती. त्यांचे वडील अपरेश लहरी एक बंगाली गायक होते. तर आई बन्सारी लहरी या संगीतकार आणि गायिका होत्या.

pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
B Praak
“…त्यामुळे माझी पत्नी आजपर्यंत माझ्यावर नाराज”, नवजात बाळाच्या मृत्यूविषयी बोलताना प्रसिद्ध गायक भावुक
Yoga Guru Sharath Jois
Yoga Guru Sharath Jois : मॅडोनाचे योग गुरू शरथ जोइस यांचं ट्रेकिंग करताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
CCI probe finds Zomato, Swiggy violating competition norms
स्पर्धा आयोगाकडून चौकशीवर अंतिम निवाडा आला नसल्याचा दावा

आणखी वाचा- Bappi Lahiri Dies: बप्पी लहरी एवढं सोनं अंगावर का घालायचे?; खुलासा करताना म्हणाले होते, “माझा आवडता…”

बप्पी लहरी यांना संगीताचं सुरुवातीचं शिक्षण त्यांच्या घरीच मिळालं होतं. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वयाच्या ३ ऱ्या वर्षी तबला वादन शिकायला सुरुवात केली होती. त्यांनी बॉलिवूडला रॉक आणि डिस्को या संगीत प्रकाराची ओळखच करून दिली नाही तर त्याच्या तालावर थिरकण्यासाठी भाग पाडलं होतं. ८० च्या दशकात त्यांच्या गाण्यांनी बॉलिवूडवर अक्षरशः राज्य केलं होतं.

बप्पी लहरी यांनी वयाच्या १७ वर्षीच त्यांना संगीतकार व्हायचं आहे हे ठरवून टाकलं होतं. एसडी बर्मन त्यांच्यासाठी प्रेरणा होते. ते त्यांचीच गाणी ऐकून संगीताचा रियाज करत असत. ८० च्या दशकात बप्पी लहरी यांनी बॉलिवूडला डिस्को डान्सची ओळख करून दिली. ताहिर हुसैनच्या ‘जख्मी’ चित्रपटातून बप्पी लहरी यांना स्वतःची वेगळी ओळख मिळाली होती. या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायक आणि संगीतकार अशी दुहेरी भूमिका पार पाडली. याच चित्रपटानं त्यांना प्रसिद्धीही मिळवून दिली होती. त्यांनी अखेरचं गाणं ‘भंकस’ हे २०२०मध्ये चित्रपट ‘बागी ३’साठी गायलं होतं.

आणखी वाचा- जेव्हा राज कुमार यांनी बप्पी लहरींच्या दागिण्यांची उडवलेली खिल्ली; म्हणाले होते, “मंगळसूत्राची…”

दरम्यान, बप्पी लहरी यांना एप्रिल २०२१ मध्ये करोना संसर्गही झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर ते काही दिवसांमध्येच बरे झाले. डॉक्टरांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “बप्पी लहरी मागील महिनाभरापासून रुग्णालयात उपचार घेत होते. यानंतर त्यांना सोमवारी (१४ फेब्रुवारी) घरी सोडण्यात आलं. मात्र, मंगळवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घरीच डॉक्टर बोलावून तपासणी केली. यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.”