बॉलीवूडमध्ये चित्रपटात नवेनवे प्रयोग चालूच असतात. स्टंट, गाणी, झिरो साइझ फिगर तर कुणी सिक्स पॅक अॅब्जने प्रेक्षकांचे लक्ष्य क्रेंद्रीत करण्याचा प्रयत्न करतं. ‘गुंडे’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटात एक संपूर्ण बंगाली गाणे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच हिंदीऐवजी संपूर्ण गाणे बंगाली भाषेत संगीतबद्ध केले जाणार आहे.
हे गाणे रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरवर चित्रीत करण्यात येणार आहे. सोहेल सेनचे संगीत असलेल्या या गाण्यास बप्पी लहरी गाणार आहेत. सोहेल सेनने स्वतः ही माहिती दिली असून, त्याने याबाबत अधिक काही सांगण्यास नकार दिला.
‘गुंडे’मध्ये बप्पी लहरींचे बंगाली गाणे
गुंडे' चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटात एक संपूर्ण बंगाली गाणे टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
First published on: 09-12-2013 at 03:02 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bappi lahiri sings bengali song in ranveer singh arjun kapoors gunday