बॉलीवूडमध्ये चित्रपटात नवेनवे प्रयोग चालूच असतात. स्टंट, गाणी, झिरो साइझ फिगर तर कुणी सिक्स पॅक अॅब्जने प्रेक्षकांचे लक्ष्य क्रेंद्रीत करण्याचा प्रयत्न करतं. ‘गुंडे’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटात एक संपूर्ण बंगाली गाणे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच हिंदीऐवजी संपूर्ण गाणे बंगाली भाषेत संगीतबद्ध केले जाणार आहे.
हे गाणे रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरवर चित्रीत करण्यात येणार आहे. सोहेल सेनचे संगीत असलेल्या या गाण्यास बप्पी लहरी गाणार आहेत. सोहेल सेनने स्वतः ही माहिती दिली असून, त्याने याबाबत अधिक काही सांगण्यास नकार दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा