Santosh is UK’s official entry to Oscars: भारताने ऑस्करसाठी ‘लापता लेडीज’ चित्रपट पाठवला आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. यूकेने एक भारतीय कलाकारांची मांदियाळी असलेला एक सिनेमा ऑस्करसाठी पाठवला आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात उत्तर भारतातील एका विधवा महिलेची कथा दाखवण्यात आली आहे.

ब्रिटिश-भारतीय चित्रपट दिग्दर्शक संध्या सुरीचा ‘संतोष’ची चित्रपट ब्रिटिश अकादमीने ऑस्करच्या आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी यूकेकडून पाठवला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या ७७ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये अन सरटेन रिगार्ड विभागात ‘संतोष’ चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होता. हा चित्रपट हिंदी भाषेत चित्रीत केलेला आहे. यात शहाना गोस्वामी मुख्य भूमिकेत आहे. सुनीता राजवार, संजय बिश्नोई, कुशल दुबे आणि इतर कलाकारांनी या सिनेमात भूमिका केल्या आहेत.

हेही वाचा – आमदार धिरज देशमुखांच्या सासऱ्यांची नेटफ्लिक्सने ४७ कोटींची फसवणूक केली? ओटीटी प्लॅटफॉर्मने दिलं स्पष्टीकरण

‘संतोष’ या चित्रपटात उत्तर भारतातील ग्रामीण भागातील एका २८ वर्षीय विधवेची कथा दाखवण्यात आली आहे. ही विधवा महिला तिच्या पतीच्या मृत्यूनंतर हवालदार बनते. एका अल्पवयीन मुलीच्या हत्येचा तपास करण्यासाठी संतोषला निवडलं जातं आणि मग तिच्या आयुष्याला घडणाऱ्या घटना या चित्रपटात पाहायला मिळतात. हा चित्रपट ब्रिटनमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.

हेही वाचा – “…अन् आमिर खडकामागे जाऊन रडू लागला”; ट्विंकल खन्नाने सांगितला किस्सा, म्हणाली, “मी अक्षयबद्दल…”

संध्या सुरीच्या काही गाजलेल्या डॉक्युमेंट्री आहेत. २००५ मधील ‘आय फॉर इंडिया’ आणि २०१८ मधील ‘अराउंड इंडिया विथ अ मूव्ही कॅमेरा’ यासाठी संध्या ओळखली जाते. ‘संतोष’ चित्रपटासाठी लुईसा गेर्स्टीनने संगीत दिले आहे. तर छायांकन लेनर्ट हिलेगे यांनी केले आहे. मॅक्सिम पोझी-गार्सियाने संपादनाची जबाबदारी सांभाळली होती. जेम्स बॉशर, बाल्थाझार डी गाने, माईक गुड्रिज आणि ॲलन मॅकअलेक्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.

हेही वाचा – आर्याला घराबाहेर का काढलं? अखेर ‘बिग बॉस’च्या ‘बॉस’ने सोडलं मौन; म्हणाले, “वारंवार फुटेज तपासलं, चर्चा…”

भारताने ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म या श्रेणीसाठी ‘लापता लेडीज’ हा चित्रपट पाठवला आहे. किरण रावने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रांटा, स्पर्श श्रीवास्तव आणि रवी किशन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.