बॉलिवूडमध्ये दबंग म्हणून प्रसिध्द असलेल्या सलमान खानने अत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींबरोबर मोठ्यापडद्यावर रोमान्स केला आहे. परंतु, बॉलिवूडमधील अशी एक अभिनेत्री आहे जिच्याबरोबर मोठ्या पडद्यावर सोमान्स करताना सलमानला अवघडल्यासारखे वाटते. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून सोनम कपूर आहे. सुरज बडजात्यांच्या प्रेम रतन धन पायो या आगामी चित्रपटात सलमान आणि सोनम एकत्र काम करत आहेत. सोनमबरोबरचे चित्रपटातील रोमान्टिक दृष्य चित्रित होत असताना सलमानला आपला चांगला मित्र आणि अभिनेता अनिल कपूरची आठवण येते. सोनम कपूर अभिनेता अनिल कपूरची मुलगी आहे. एका वृत्तपत्रातील बातमीनुसार, प्रेम रतन धन पायो चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान रोमान्टिक दृष्य साकारणे सलमानला कठीण जात असून, चित्रपटात सोनमबरोबर रोमान्स करताना त्याला सहजता जाणवत नाहीये. सलमानने याआधी सोनाक्षी सिन्हा, डेजी शाह, जॅकलिन फर्नांडिससारख्या त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या अनेक अभिनेत्रींबरोबर लिलया काम केले आहे. परंतु, यावेळी त्याला अवघडलेपण जाणवत आहे. याबाबत वृत्तपत्र प्रतिनिधीशी बोलताना सलमान म्हणाला, सोनम माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे. तिचे वडील माझे जुने मित्र आहेत. सोनम जेव्हा छोटी होती, तेव्हापासून मी तिला ओळखतो. त्यामुळेच अवघडल्यासारखे वाटत असल्याची कबुली त्याने दिली.

Story img Loader