बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. मात्र, करीना आधी सैफने अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न केले होते. त्या दोघांनी १९९१ मध्ये लग्न केले होते. अमृता ही सैफ पेक्षा वयाने १२ वर्षांनी मोठी आहे. तरी देखील त्या दोघांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले.
ज्यावेळी या दोघांच लग्न झालं तेव्हा सैफ हा फक्त २१ वर्षांचा होता तर अमृता ३३ वर्षांची होती. १३ वर्षे संसार केल्यानंतर ते विभक्त झाले. ज्यावेळी त्यांचा घटस्फोट झाला तेव्हा सारा दहा वर्षांची होती तर तर इब्राहिम ४ वर्षांचा होता.
आणखी वाचा : आमिर ‘या’ अभिनेत्री सोबत करणार तिसरं लग्न?
दरम्यान, एका मुलाखतीत अमृताने सांगितले की लग्नाच्या ४ वर्षांपर्यंत ती मुलं होण्याचस टाळत होती. याच कारण सैफ असल्याचं तिने सांगितलं आहे. अमृता म्हणाली, जेव्हा तिने सैफशी लग्न केले होते. तेव्हा तो बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत होता. या सगळ्यात मुलं झाली तर त्याच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या येतील त्यामुळे तिने मुलांसाठी नकार दिला होता.
आणखी वाचा : बिग बींची पान मसाला कंपनीला कायदेशीर नोटीस; जाणून घ्या कारण…
अमृता म्हणाली, सैफच्या करिअरसाठी मला मुले होऊ द्यायची नव्हती. लग्नाच्या चार वर्षांनी सारा अली खानचा जन्म झाला आणि मग सहा वर्षांनंतर इब्राहिमचा जन्म झाला. सैफ त्याच्या मुलांचा फार विचार करतो त्यांची काळजी करतो. पण लोकांनी त्याला कधीच गांभीर्याने घेतले नाही.