गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गौतमी पाटील हे नाव सातत्याने चर्चेत पाहायला मिळत आहे. तिच्या लावणीचा वाद चांगलाच गाजला होता. त्यानंतर गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्राच्या मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यात चर्चेतील नाव ठरलं आहे. काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलने तिच्या आयुष्यातील भावी जोडीदाराबद्दल भाष्य केले होते. या मुद्द्यावरुन आता एका शेतकऱ्याच्या मुलाने तिला पत्र लिहिलं आहे.

बीडमध्ये राहणाऱ्या किसानपुत्र श्रीकांत गडाले यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुकला एक पोस्ट शेअर केली होती. यात त्यांनी गौतमी पाटीलला पत्र लिहित त्याचा फोटो शेअर केला होता. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्राद्वारे त्यांनी गौतमी पाटीलला ‘तुझ्यासोबत लग्न करायला कोणीच तयार नाही’, असं म्हणत चांगलीच कानउघडणी केली आहे.
आणखी वाचा : Open Letter: गौतमी पाटील, तुला हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्राचा बिहार करु नकोस!

What Anna Hajare Said?
Anna Hazare Emotional : अरविंद केजरीवाल यांच्या पराभवानंतर अण्णा हजारे रडले; “तुमच्यावर इतकं प्रेम केलं, पण..”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
Santosh Juvekar
“जर माझं प्रेम असेल…”, अभिनेता संतोष जुवेकरला ‘अशी’ पाहिजे आयुष्याची जोडीदार; म्हणाला…
dhananjay Munde and karuna munde son
धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या मुलाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खळबळ; म्हणाला, “माझे बाबा…”
shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
Pankaja Munde on Dhananjay Munde
“धनंजय मुंडे फडणवीस-पवारांचे खास, राजीनामा मागणार नाहीत”, क्षीरसागरांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं दोन वाक्यात उत्तर; म्हणाल्या…

किसानपुत्र श्रीकांत गडाले यांचे पत्र

“गौतमी पाटीलचे हाल बेहाल, तुमचे चाहते लाखो पण.. लग्नाला तयार कोणीच नाही.

आमच्या महाराष्ट्रात मुलगी लग्नाला आली की मुलाच्या घरचे मुलींच्या घराचे उंबरठे झिजवतात. तरी मुलाला मुलगी मिळत नाही आणि मुलीला लग्न कर म्हणायची वेळ येत नाही.

गौतमी पाटील तुमचे लाखो चाहते पण.. लग्नाला कोणीच तयार नाही. तुमचे ठुमके वर लाखो फिदा, पण लग्नाला कुणीच तयार नाही, जरा आत्मपरीक्षण करा.

या महाराष्ट्रात चटक मटक भाजी एक दिवस गोड लागते, पण पोट व मन भरायला चटणी भाकरी भाजी ठेचाच लागतो.

हा कृषिप्रधान देश आहे तुमच्या डान्सचे ठुमके कमी करा गौतमी पाटील तुम्ही आत्मपरीक्षण करा.

खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री अयोध्येला निघालेत, महाराष्ट्रात विजेचा कडकडाट आणि अवकाळी पावसाने पिके गेली, मुकी जनावरे गेली. तरी काही तरुण वर्ग तुमच्याच नादात असला आणि लाखो चाहते असले तरी एकही लग्नाला तयार नाही.

किसान पुत्र श्रीकांत गडळे सांगतो … इतर शेतकरी पुत्र उपाशी राहतील कापसाला पाणी बकेटने मारतील पण लग्नाला कोणीच तयार होणार नाही. आत्मपरीक्षण करा”, असे किसानपुत्र श्रीकांत गडाले यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली

दरम्यान किसानपुत्र श्रीकांत गडाले यांनी गौतमी पाटीलचे हाल बेहाल’, असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी त्याच्या या पत्राला दाद दिली आहे. तर काहींनी त्यांच्यावर टीकाही केल्याचे कमेंटमध्ये पाहायला मिळत आहे. आता या पत्रावर गौतमी पाटील काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader