अभिनेता रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या आगामी ‘बेफिकरे’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोमवारी प्रदर्शित झाला. वाणीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. यामध्ये रणवीर आणि वाणी चुंबन करताना दिसत आहेत. दोघेही फ्रान्समधील एका उंच इमारतीच्या छतावर बसले असून दूरवर आयफेल टॉवरची अस्पष्ट प्रतिकृती दिसते. ‘बेफिकरे’च्या निमित्ताने रणवीर आणि वाणी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. दरम्यान, हे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता बॉलीवूड चाहत्यांमध्ये रणवीर आणि वाणीच्या ‘फ्रेंच किस’ची चर्चा रंगू लागली आहे.

Story img Loader