बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी संध्याकाळी अंमली पदार्थ विरोधी पथक म्हणजेच (NCB) अरमान कोहलीच्या मुंबईतील घरावर नुकताच छापा टाकला होता. ड्रग्स पेडलरशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्याच्या घरावर हा छापा टाकण्यात आला आहे. त्यावेळी अरमानच्या घरात काही ड्रग्ज अढळून आले. शुक्रवारी रात्री एका ड्रग्स विक्रेत्याला एनसीबीने पकडलं. त्याची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर हा छापा टाकण्यात आला आहे. त्यानंतर अरमानची चौकशी करण्यात आली होती. आज सकाळी मुंबई पोलिसांनी अरमानला या प्रकरणी अटक केली आहे.

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या एनसीबीच्या तपासाने अनेक अभिनेत्यांना आपल्या कचाट्यात घेतलं आहे. २०१८ मध्ये अरमानच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला होता. नीरु रंधावाला गंभीर इजा झाली असून उपचारासाठी तिला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे दोघेही २०१५ पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत.

आणखी वाचा : ती सध्या काय करते…, जाणून घ्या कॅप्टन विक्रम बत्रांच्या प्रेयसीबद्दल

नीरुने तक्रार दाखल केल्यानंतर अरमान फरार झाला होता. चौकशीसाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान त्याच्या वडिलांशीही पोलिसांनी संपर्क साधला असता आपल्याला काहीच माहित नसल्याचे त्यांनी सांगितले होते. अखेर लोणावळा येथून मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. एका क्षुल्लक गोष्टीवरून अरमान आणि निरुमध्ये भांडण झाले होते आणि त्यानंतर रागाच्या भरात अरमानने तिला बेदम मारहाण केली होती.

आणखी वाचा : Video : ५० किलोंचं वजन उचलत उर्वशीने केलं वर्कआऊट, नेटकरी आवाक

अरमानकडून मारहाण झाल्याच्या तक्रारी त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसींकडूनही करण्यात आल्या होत्या. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेत्री मुनमुन दत्तानेही २०१३मध्ये अरमानविरोधात मारहाणीचा आरोप केला होता. ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये ही त्याने सहस्पर्धक सोफिया हयातवर हात उगारल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. त्यानंतर जामिनावर तो सुटला होता. ‘बिग बॉस’दरम्यान अरमान आणि काजोलची बहिण तनिषा मुखर्जी यांच्यात जवळीक वाढली. मात्र, अरमानच्या तापट स्वभावामुळे त्यांचा ब्रेकअप झाला होता.