बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि पत्नी ट्विंकल खन्नाची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ते सध्या मुलगी नितारासोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. ट्विंकलचा २९ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. तिचा वाढदिवस आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ते मालदिवला गेले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का ट्विंकलने अक्षयशी लग्न करण्याआधी दोन वेळा साखरपुडा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ट्विंकल आणि अक्षय जेव्हा रिलेशनशिपमध्ये आले होते. तेव्हा त्यांचा साखरपुडा झाला होता. पण काही काळानंतर अक्षय आणि शिल्पा शेट्टीच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर ट्विंकलने अक्षयला शिल्पापासून दूर राहण्यास सांगितले. पण अक्षय काही ऐकले नाही. त्यानंतर ट्विंकलने अक्षयसोबत साखरपुडा मोडला. कालांतराने अक्षयला त्याची चुक कळली आणि तो शिल्पापासून लांब झाला. एवढचं नाही तर त्याने ट्विंकलची माफी मागितली आणि त्यानंतर ट्विंकलने अक्षयला माफ केले. त्यावेळी ट्विंकलचा अक्षय कुमारसोबत पुन्हा एकदा साखरपुडा झाला होता.

आणखी वाचा : घटस्फोटानंतर समांथा आणि नागा चैतन्य पहिल्यांदाच आले समोरा-समोर अन्…

आणखी वाचा : महाभारतातील भीम आर्थिक संकटात; सरकारकडे केली पेन्शनची मागणी

अक्षय आणि ट्विंकलचं १७ जानेवारी २००१ मध्ये लग्न झालं. पण अक्षयने जेव्हा ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केले, तेव्हा ट्विंककलचा मेला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. तर त्यावेळी तिने अक्षयसमोर अट ठेवली होती की जर हा चित्रपट फ्लॉप झाला तर लग्न करू आणि हिट झाला तर थोडाकाळ थांबू. तर मेला हा चित्रपट प्रदर्शित झाला असून फ्लॉप ठरला आणि त्यानंतर सांगितल्या प्रमाणे ट्विंकलने लग्न करण्यास होकार दिला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Before getting married to akshay kumar twinkle khanna got engaged for twice dcp