बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल काही दिवसांपूर्वी लग्न बंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांच्या हळदीचे आणि संगीत कार्यक्रमातील काही फोटो कतरिना आणि विकीने शेअर केले होते. आता ते दोघे ही कुटुंबासोबत मुंबईला परतले आहेत. आता त्यांच्या चाहत्यांना कतरिना आणि विकीची लव्ह-स्टोरी जाणून घ्यायची आहे.

कतरिना आणि विकी यांनी लग्न तर केलं. पण लग्नाला होकार देण्याआधी कतरिनाने विकीसमोर एक अट ठेवली होती. विकीने ते अट मान्य केल्यानंतर कतरिना लग्नासाठी हो म्हणाली याचा खुलासा कतरिनाच्या एका मित्राने केला आहे. “त्यांची भेट, प्रेम, रोमांस आणि लग्न हे सगळं अचानक झालं. विकीने दोन महिन्याच्या रिलेशनशिपनंतर लगेच तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. खरतरं कतरिनाला याविषयी खात्री नव्हती,” असं तिचा मित्र म्हणाला.

आणखी वाचा : ‘काय विचित्र प्रकार आहे…’, व्हिडीओत पॅन्टचं बटन बंद केल्यामुळे उर्फी जावेद ट्रोल

आणखी वाचा : “हिला कसला एवढा अॅटिट्यूड…”, जान्हवीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

पुढे तिचा मित्र म्हणाला, “कतरिनाने लग्नासाठी हो बोलण्याआधी विकीसमोर एक अट ठेवली होती. अट अशी होती की लग्नानंतर विकीला कतरिनाच्या आई आणि बहिण-भावाला तेच प्रेम आणि सन्मान द्यावा लागेल जो तो तिला देतो. दरम्यान, लग्नाआधी कतरिनाचं कुटुंब विकीला भेटलं सुद्धा नव्हतं. पण त्यांना एकत्र पाहिल्यानंतर असं वाटतं की ते एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात.”

Story img Loader