मराठी चित्रपटसृष्टीत ‘वाजले की बारा’ या लावणीने आपल्या आवाजाची जादू रसिक प्रेक्षकांवर चालवणारी बेला शेंडे बॉलीवूडमध्येही गाजत आहे. कंगना रणावतची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रज्जो’ चित्रपटातील ‘जुल्मी रे जुल्मी’ हे गाणे सध्या लोकप्रिय झाले असून, बेलाच्या आवाजाला रसिकांनी पसंतीची पावती दिली आहे. देव कोहली यांनी लिहलेल्या या गीताला उत्तम सिंग यांनी संगीतबद्ध केले आहे.
यापूर्वी, ‘जोधा-अकबर’ चित्रपटातील ‘मनमोहना’ हे भक्तीगीत, वॉट्स यूर राशीमधील ‘सू छे सू छे’, ‘पहेली’ चित्रपटातील ‘कंगना रे’ ही बेलाने गायलेली गाणी गाजली आहेत. पण, ‘रज्जो’मधील ‘जुल्मी रे’ गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
विश्वास पाटील दिग्दर्शित ‘रज्जो’ चित्रपट मुस्लिम मुलगी आणि ब्राम्हण मुलगा यांच्या प्रेमकथेवर आधारित आहे. या चित्रपटात महेश मांजरेकरचीही भूमिका असून त्यांनी यात तृतीय पंथीयाची (षंढ) भूमिका साकरली आहे. पारस अरोरा, प्रकाश राज, जया प्रदा आणि उपेंद्र लिमये यांच्या भूमिका असलेला ‘रज्जो’ १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader