बेळगाव येथे पुढील वर्षी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. हे नाटय़संमेलन आता ६ ते ८ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत होणार असल्याचे अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले.
या अगोदर नाटय़संमेलन ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०१५ या तारखांना होणार होते. मात्र, बेळगाव येथील ज्या मैदानावर नाटय़संमेलन होणार होते, त्या मैदानावर २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पार पाडल्यानंतर उर्वरित तीन दिवसांच्या अवधीत नाटय़संमेलनाचा मंडप आणि अन्य तयारी करणे शक्य नसल्याने, केवळ याच तांत्रिक कारणामुळे संमेलनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्याचेही जोशी म्हणाले.
ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका फैय्याज यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.

Story img Loader