हिंदी चित्रपटवाले हॉलिवूड आणि टॉलिवूडची कॉपी करतात. हे वेळोवेळी अनेक चित्रपटांतून दिसून आलंय. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ देखील त्याला काही अपवाद नाही. त्याच्या या चित्रपटाचं नुकतंच ट्रेलर रिलीज करण्यासोबतच चित्रपटाचं पहिलं वहिलं गाणं ‘मरजावाँ’ देखील रिलीज करण्यात आलं. या गाण्याचं पोस्टर लॉंच होताच यामध्ये कॉपीचा नजारा पहायला मिळाला. एका ट्रॅव्हल ब्लॉगरने शेअर केलेल्या त्याच्या फोटोवरून ‘मरजावाँ’ गाण्याचं पोस्टर कॉपी केलं असल्याचं सांगण्यात येतंय.
अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री वाणी कपूर लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणारेय. ‘बेल बॉटम’ या चित्रपटात ते दोघेही पहिल्यांदा स्क्रीन शेअर करणार आहेत. अक्षय कुमारच्या या ‘बेल बॉटम’ चित्रपटासाठी प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची ही प्रतिक्षा संपणार असून येत्या १९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढावी यासाठी चित्रपटाचा ट्रेलर आणि पहिलं गाणं ‘मरजावाँ’ रिलीज करण्यात आलंय. ‘मरजावाँ’ गाण्याच्या पोस्टरमध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि वाणी कपूर हे दोघेही एका ट्रेनच्या दारावर उभं राहून बाहेर झोकवत एका इंटीमेट पोजमध्ये रोमान्स करताना दिसून येत आहे. या पोस्टरमधल्या फर्स्ट लुकवरून या ऑनस्क्रीन कपलच्या एक रोमांचक प्रेम कहाणीचा अंदाज येतोय. पण या पोस्टरवर आता कॉपीकॅटचा आरोप करण्यात येतोय.
View this post on Instagram
अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’चं हे पोस्टर एका ट्रॅव्हल ब्लॉगरचा २०१९ मध्ये व्हायरल झालेल्या एका फोटोची कॉपी केलं असल्याचं सांगण्यात येतंय. या पोस्टरवरून अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री वाणी कपूरला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरूवात केलीय. तर काही फॅन्सनी अक्षय कुमारचं समर्थन करत त्यांनी दिलेली पोज ही कॉमन असल्याचं सांगण्यात येतंय. अक्षय आणि वाणीच्या या पोस्टरआधी सुरूवातीला प्रभास आणि पूजा हेगडेच्या ‘राधे श्याम’चा एक पोस्टर शेअर करत अक्षयच्या फिल्मचं पोस्टर यावरून कॉपी केल्याचं सांगत होते.
View this post on Instagram
यावरून कॉपी केलंय ‘मरजावाँ’चं पोस्टर
२०१९ मध्ये एका सुप्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगरने क्लिक केलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ट्रॅव्हल ब्लॉगर कॅमिल ही एक डिजीटल क्रिएटर असून तिला आपल्या पतीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी पर्यंटन करण्याची आवड आहे. जगभरात पर्यंटन करत असताना तिथल्या ठिकाणाहून फोटो क्लिक करून ती सोशल मीडियावर शेअर करत असते. २०१९ मध्ये श्रीलंकामध्ये गेलेली असताना तिने आपल्या पतीसोबत एक रोमॅण्टिक पोज देतानाचा फोटो शेअर केला होता. हा फोटो त्यावेळी प्रचंड व्हायरल झाला होता. तिच्या या फोटोवरून अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’चं पोस्टर कॉपी केल्याचा आरोप सध्या नेटकरी मंडळी करत आहेत.
View this post on Instagram
‘मरजावाँ’ गाण्याच्या या पोस्टरमध्ये हा लव्ह बॅलेड शॉट स्कॉटलंडमधील आहे. हे रोमँटिक गाणं गायक गुरनाझर आणि असीस कौर यांनी गायलं आहे. तसंच गुर्नाझर सिंग यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मोठ्या प्रमाणात मिळतेय.