प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्मा हिचे निधन झाले आहे. वयाच्या २४ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. कोलकातामधील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिला मंगळवारी हृदयविकाराचे अनेक झटके आल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. कोलकाता हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला सीपीआर देण्यात आला होता त्यानंतर तिची प्रकृती खूपच नाजूक होती. मृत्यूशी लढणाऱ्या एंड्रिला शर्माची ही झुंज अशस्वी ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१ नोव्हेंबरला ब्रेन स्ट्रोक आल्याने एंड्रिलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिला इंट्राक्रॅनियल हॅम्रेज झाले होते, त्यानंतर मेंदुच्या डाव्या भागात फ्रंटोटेम्पोरोपॅरिएटल डी-कंप्रेसिव्ह क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया करावी लागली होती. आनंदबाजार डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, एंड्रिलाच्या नवीन सीटी स्कॅन अहवालात तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी असल्याचं दिसून आलं होतं. जिथं तिचं ऑपरेशन झालं होतं, त्याच भागात गाठी आल्या असल्याने डॉक्टरांनी त्या कमी करण्यासाठी नवीन औषधं दिली होती, पण संसर्ग धोकादायक स्थितीत पोहोचला होता. अशातच आता तिला हृदयविकाराचे अनेक झटके आल्यानंतर प्रकृती खालावल्याने तिला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं.

आणखी वाचा- ज्येष्ठ अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे निधन

दरम्यान काही दिवसांपूर्वीच एंड्रिलाचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता सब्यसाची चौधरीने सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होता. “मी हे इथे लिहीन असं कधीच वाटलं नव्हतं. पण आज ती वेळ आली आहे. एंड्रिलासाठी प्रार्थना करा. काही तरी चमत्कार होवो आणि तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करा. ती खूप अडचणींविरुद्ध लढत आहे,” असं सब्यसाचीने लिहिलं होतं.

एंड्रिलाचा जन्म पश्चिम बंगालमधील बेरहामपूर येथे झाला होता. तिने ‘झुमुर’ मालिकेतून टीव्ही पदार्पण केलं होतं आणि ‘महापीठ तारपीठ’, ‘जीवन ज्योती’ आणि ‘जीवन काठी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं. तसेच ‘अमी दीदी नंबर १’ आणि टलव्ह कॅफेट सारख्या चित्रपटांतही ती दिसली होती.