बॉलिवूडमध्ये मैत्रीची परिभाषा बदलणारे बरेच सेलिब्रिटी पाहायला मिळतात. कोणी मैत्रीखातर चित्रपटामध्ये आपल्या मित्राचं, मैत्रिणीचं नाव पुढे करतं, तर कोणी मित्रांसाठी खास पार्टीचं आयोजन करतं. बी- टाऊनच्या अशाच काही ‘बेस्ट बडीज’मध्ये फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या नावाचा समावेश होतो. बऱ्याच वर्षांपासून त्यांच्यात मैत्रीचं चांगंल नातं होतं. पण, आता मात्र त्यांच्या नात्याची समीकरणं बदलली असून, या दोघांमध्येही दुरावा आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मनीष नेहमीच विविध पार्ट्यांचं आयोजन करत असतो. पण, उर्मिला मात्र त्याच्या कोणत्याच पार्टीला हजेरी लावत नाहीये. किंबहुना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रंगीला गर्ल’ उर्मिला आणि मनीषचं नातं आता पूर्वीप्रमाणे राहिलेलं नाही. एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला- मनीष यांच्यात बऱ्याच दिवसांपासून अबोला आहे. त्यांच्यात काहीतरी बिनसलं आहे. त्यांनी एकमेकांकडे या गोष्टीची वाच्यता केली नसून हा अबोला आता आणखी किती दिवस टिकणार हाच मोठा प्रश्न आहे. या निखळ मैत्रीमध्ये आलेला दुरावा आतापर्यंत अनेकांच्या नजरेत आला आहे.

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

मनीष आणि उर्मिलाच्या नात्यात दुरावा आल्यामुळे आता त्यांच्यातील दुरावा दूर करण्यासाठी कोण पुढाकार घेणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे. इंडस्ट्रीतील या खास मित्रांच्या नात्यात पुन्हा तोच गोडवा आणण्यासाठी निर्माता- दिग्दर्शक करण जोहरवरच अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. कारण, मनीष आणि करणमध्ये चांगली मैत्री आहे. त्यामुळे आता या दोघांमध्ये पुन्हा एकदा तीच निखळ मैत्री पाहता येणार का, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.