बॉलीवूडचे अनेक चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होत असताना फरहान अख्तरने अभिनय केलेला ‘भाग मिल्खा भाग’ .या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटात फरहान अख्तरने मिल्खा सिंगची भूमिका केली आहे.
चित्रपटातील एका दृश्यात मिल्खा सिंगला पाकिस्तानात जाण्यास सांगितले असते. पण १९४७ सालातील दंगलीत त्याच्या कुटुंबीयांना अत्यंत निर्दयीपणे मारण्यात आल्यामुळे तो पाकिस्तानामध्ये जाण्यास नकार देतो. त्यावर ” मुझसे नही होगा. मै पाकिस्तान नही जाउगा” या फरहानच्या संवादामुळे पाकिस्तान नियंत्रण मंडळाने चित्रपटाच्या प्रकाशनावर बंदी आणली. दुसरीकडे, हा चित्रपट प्रदर्शित करणारे वायकॉम १८ या चित्रपटातील मिल्खा यांच्या वास्तविक जीवन कथेमध्ये कोणताही बदल करण्यास तयार नसून पाकिस्तानमध्ये प्रदर्शन न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

Story img Loader