महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित आणि फरहान अख्तरचा अभिनय सजलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाची अमेरिकेतील पहिल्या आठवड्यातील कमाई ६४७,००० डॉलर्स इतकी आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या या चित्रपटाने अनेरिकेतील पॉप्युलॅरिटी चार्टमध्ये १५ वे स्थान पटकावले आहे. अमेरिकेतील चित्रपटांच्या कामगिरीवर लक्ष ठेवणा-या ‘बॉक्स ऑफिस मोजो’ या वेबसाईटनुसार अमेरिकेत हा चित्रपट १४० चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून, प्रदर्शनापासूनच्या पहिल्या तीन दिवसांतील या चित्रपटाचे उत्पन्न ६४७,११२ डॉलर्स इतके नोंदवले गेले.
अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाने या चित्रपटाच्या समीक्षणात म्हटले आहे की, मिल्खा सिंग यांच्यावर आधारित या चित्रपटाला बॉलिवूड पद्धतीने चित्रीत करण्यात आले आहे. भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांची भूमिका प्रतिभावान कलाकार फराहन अख्तर याने केली असून, यात मिल्खा सिंग यांच्या जीवनाचा प्रवास अत्यंत नाट्यमय पद्धतीने दाखविण्यात आला आहे. याशिवाय अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्स आणि हॉलिवूड रिपोर्टरसारख्या अनेक दैनिकांनी या चित्रपटाची दखल घेतली असून, फरहान अख्तरच्या कामाची आणि चित्रपटाची प्रशंसा केली आहे.
‘भाग मिल्खा भाग’चे अमेरिकेतील उत्पन्न ६४७,००० डॉलर्स
महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित आणि फरहान अख्तरचा अभिनय सजलेल्या 'भाग मिल्खा भाग' चित्रपटाची अमेरिकेतील पहिल्या आठवड्यातील कमाई ६४७,००० डॉलर्स इतकी आहे.
First published on: 17-07-2013 at 01:51 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaag milkha bhaag earns 647000 ranks 15 in popularity chart