विख्यात धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘भाग मिल्खा भाग’ हा नुकताच महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर आता मध्यप्रदेश सरकारनेही या चित्रपटास करमुक्त केले आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ‘भाग मिल्खा भाग’ करमुक्त करण्यात आल्याचे जाहीर केले.
“ब-याच काळानंतर देशभक्तीवर चित्रपट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारने चित्रपटास करमुक्त करण्याचा निर्णय घेतला,” असे चौहान म्हणाले.
फरहान अख्तर याने चित्रपटात मिल्खा सिंगची प्रमुख भूमिका केली असून १२ जुलैला हा चित्रपट देशभर प्रदर्शित करण्यात आला.
‘भाग मिल्खा भाग’ मध्यप्रदेशमध्येही करमुक्त
विख्यात धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित 'भाग मिल्खा भाग' हा नुकताच महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला आहे.
First published on: 22-07-2013 at 11:42 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaag milkha bhaag is tax free in madhya pradesh