आगामी भाग मिल्खा भाग हा आपल्या जीवनावर आधारित चित्रपट तरूणांना प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे महान धावपटू मिल्खा सिंग यांनी म्हटले आहे. १२ जुलै रोजी प्रदर्शित होणारा राकेश ओमप्रकाश दिग्दर्शित हा चित्रपट मिल्खा सिंग यांनी पाहिला असून, त्याच्या प्रदर्शनास मान्यता दिली आहे.
मी दिल्ली येथे हा चित्रपट पाहिला असून, चित्रपटातील कुठल्याही भागासाठी आपली कोणतीही हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हा चित्रपट तरूणांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ७७ वर्षीय मिल्खा सिंग ज्यांची फ्लाईंग शीख म्हणूनही ओळख आहे, ते चित्रपटाच्या प्रिमियरला लंडन येथे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याबरोबर फरान अख्तर, सोनम कपूर, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि चित्रपटाशी संबंधीत अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मिल्खा सिंग म्हणाले, “चित्रपटाचे लंडन येथे खास प्रदर्शन होणार आहे. फरहानने मला त्यांच्याबरोबर उपस्थित राहण्याचा आग्रह केला. तो म्हणाला तिकडे माझे अनेक चाहते असून मला प्रत्यक्ष पाहाण्याची त्यांची इच्छा आहे.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा