येथे सुरू असलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात फरहान अख्तर याची भूमिका असलेल्या भाग मिल्खा भाग या जीवनचरित्रात्मक चित्रपटाला नऊ पुरस्कार मिळाले असून त्यात तांत्रिक पुरस्कारांचाही समावेश आहे.
राकेश ओमप्रकाश मेहरा व फरहान हे या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत. उत्कृष्ट छायालेखन (विनोद प्रधान), उत्कृष्ट पटक था (प्रसून जोशी) उत्कृष्ट संवाद (प्रसून जोशी) उत्कृष्ट संपादन (पी.एस.भारती), उत्कृष्ट संगीत रचना (नकुल कामटे). उत्कृष्ट ध्वनी मिश्रण( प्रणव शुक्ला), उत्कृष्ट पाश्र्वगायन (शंकर-एहसान लॉय), उत्कृष्ट वेषभूषा (डॉली अहलुवालिया), उत्कृष्ट मेकअप (विक्रम गायकवाड) हे पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. क्रिश ३ चित्रपटाला तीन पुरस्कार मिळाले. त्यात उत्कृष्ट हालचाल दृश्ये (शाम कौशल व टोनी चिंग सिउ तुंग), उत्कृष्ट विशेष दृश्य परिणाम (केतन जाधव, हरेश हिंगोरानी, रेड चिलीज- व्हीएफएक्स) हे पुरस्कार या चित्रपटाला मिळाले.
हृतिक रोशन याने सांगितले की, आयफा पुरस्कार मिळाल्याने आनंद वाटला.
त्याने शाहीद कपूरच्या अगल बगल या फटा पोस्टर निकला हिरो या चित्रपटातील गाण्यावर गायक मिका सिंग याच्या साथीने नृत्य केले. मिका याने सुबह होने दे व इतर गाणी सादर केली. सोनाक्षी सिन्हा हिने बिपाशा हिट गाण्यावर अदाकारी सादर केली. बिपाशा बसू हिने कमली व बेबी डॉलवर नृत्य सादर केले. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या चेन्नई एक्सप्रेसला उत्कृष्ट ध्वनिमुद्रणाचा पुरस्कार ( विनोद वर्मा- लुंगी डान्स) मिळाला. उत्कृष्ट ध्वनी मिश्रणाचा पुरस्कार भाग मिल्खा भाग चित्रपटासाठी अनुप देव यांना मिळाला.
सैफ अली खान व वीर दास यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. अभिनेत्री करिना कपूर खान, दीपिका पदुकोण, श्रीदेवी, माधुरी दीक्षित नेने, अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, हृतिक रोशन, अनुपम खेर, प्रणिती चोप्रा, राकेश मेहरा, रमेश सिप्पी, वाणी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, अर्शद वारसी, विवेक ओबेरॉय यावेळी उपस्थित होते.
आयफा सोहळ्यात ‘भाग मिल्खा’ पुरस्कारांचा मानकरी
येथे सुरू असलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात फरहान अख्तर याची भूमिका असलेल्या भाग मिल्खा भाग या जीवनचरित्रात्मक चित्रपटाला नऊ पुरस्कार मिळाले असून त्यात तांत्रिक पुरस्कारांचाही समावेश आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-04-2014 at 12:16 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaag milkha bhaag wins nine technical awards at iifa